आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोचीमध्ये २ बेकायदा इमारती क्षणार्धात झाल्या जमीनदोस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर अंमल
  • ४ तासांपूर्वी परिसरातील रहिवाशांना हलवले

कोची - केरळच्या कोची शहरात प्रशासनाने शनिवारी दोन गगनचुंबी रहिवासी इमारती होली फेथ एच २० व अल्फा सेरेनला स्फोटकांनी पाडण्यात आले. १९ मजली होली फेथ एच २० मध्ये ९० तर १६ मजली अल्फा सेरेनमध्ये ८० फ्लॅट होते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सप्टेंबरमध्ये अशा चार इमारतींना सागरी बांधकाम नियमांच्या उल्लंघन प्रकरणात पाडण्याचे आदेश दिले होते. इतर दोन इमारती गोल्डन कायालोरम व जैन काेरल रविवारी पाडण्यात येणार आहेत. न्यायालयाने चारही इमारती पाडण्यासाठी १३८ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
अधिकाऱ्यांच्या मते, होली फेथ एच २० व अल्फा सेरेनला पाडण्यासाठी ८०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. सुरक्षेच्यादृष्टीने इमारतीच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले होते. परिसरात ड्रोन उड्डाणांना मनाई होती. सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टरनी हवाई दल व नौकांद्वारे सागरी क्षेत्राचा आढावा घेतला. रस्त्यावर सुमारे ५०० पोलिस तैनात होते. पाडकाम सुरू असताना ३०० जणांची टीम वाहतुकीचे नियंत्रण करत होती. 
> कारवाईच्या चार तास आधी परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. घर सोडण्यापूर्वी वीज उपकरणे, खिडक्या-दरवाजे बंद करण्यात यावे. आग व प्रदूषणापासून सुरक्षेच्या उद्देशाने सूचना देण्यात आली. 

> काही लोक म्हणाले, आम्ही या इमारतींमध्ये एक-एक कोटी रुपयांत फ्लॅट खरेदी केले होते. आमचे स्वप्न भंगले. प्रत्येक फ्लॅटधारककास प्रत्येकी २५-२५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे कोर्टाने आदेश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...