Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | 2 January swami vivekanand birth date, motivational story of swami vivekanand

एका परदेशी महिला स्वामीजींची वेशभूषा पाहून खिल्ली उडवत होती, तेव्हा स्वामीजींनी समजावले की, सज्जनतेची पारख कशी होते, तेव्हा शरमेने महिलेने झुकवली मान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 12:00 AM IST

एखाद्या व्यक्तीची पारख करताना लक्षात ठेवा विवेकानंदांच्या गोष्टी

 • 2 January swami vivekanand birth date, motivational story of swami vivekanand

  रिलिजन डेस्क. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी सन 1863 मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे बालपणाचे नाव नरेंद्रनाथ होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त त्यावेळी कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी धार्मिक विचारांची महिला होती. स्वामी विवेकानंद यांनी वयाच्या 25 व्या वर्षी कुटूंब सोडले आणि सन्यास घेतला. स्वामीजींचा मृत्यू 4 जुलै, 1902 ला झाला होता. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देतात.

  एखाद्या व्यक्तीच्या सज्जनचेती पारख कशी करावी हे त्यांनी एका विदेशी महिलेला सांगितले होते
  - स्वामी विवेकानंद शिकागोच्या विश्व धर्म संसदेसाठी अमेरिकेत गेले होते. धर्मसंसद सुरु होण्यासाठी काही दिवस बाकी होते. त्यावेळी धर्मसंसदमध्ये त्यांचे ऐतिहासिक उद्बोधन झाले नव्हते आणि त्यांना तेव्हा ख्यातीही मिळालेले नव्हती.
  - अमेरिकेत पोहोचल्यानंतरही ते संन्यासीच्या वेशभूषेत राहायचे. कषाय वस्त्र, डोक्यावर पगडी, हातात दंडा आणि खांद्याव चादर टाकलेली होती. याच वेशभूषेत ते एकदा शिकागोच्या रस्त्यांवर भ्रमण करत होते.
  - अमेरिकेच्या लोकांसाठी ही वेशभूषा खुप नवीन होती. ही वेशभूषा लोकांच्या हसण्याचा विषय बनली होती.
  - स्वामीजींच्या मागेमागे चालणा-या एका अमेरिकी महिलेने आपल्या सोबतच्या पुरुषाला म्हटले की, जरा या महाशयांना पाहा, कसा विचित्र पोषाख घातला आहे. स्वामी विवेकानंदांनी हे ऐकले आणि त्यांना समजले की, ती महिला भारतीय वेशभूषेची खिल्ली उडवत आहे.
  - ते थांबले आणि महिलेला संबोधित करुन म्हणाले की, 'बहिणी... माझ्या या वस्त्रांना पाहून आश्चर्य वाटू देऊ नको. तुमच्या या देशात कपड्यांवरुन लोकांची पारख होते, पण मी ज्या देशातून आलो आहे, तेथे सज्जनतेची पारख मनुष्याच्या कपड्यांवरुन नाही, तर त्याच्या चरित्र्यावरुन केली जाते. कपडे तर फक्त वरचा दिखावा आहे. व्यक्तीचे चरित्र सर्वांत जास्त महत्त्वाचे असते.'
  - स्वामीजींचे हे उत्तर ऐकूण त्या महिलेने शरमने मान झुकवली. यानंतर जेव्हा विश्व धर्म संसदेचे आयोजन झाले, तेव्हा स्वामीजींचे अद्भुत संबोधन ऐकूण अमेरिकावासीयांच्या मनात त्यांच्याविषयी श्रध्दा निर्माण झाली आणि भारताविषयी त्यांचे विचार बदलले.
  - अशा प्रकारे स्वामीजींनी भारतीय संस्कृतीला मान मिळवून दिला. व्यक्तीच्या आचरणाने त्याची खरी ओळख होते. कोणत्याही व्यक्तीची संस्कारशीलता वस्त्र किंवा आभूषणांवरुन होत नाही, तर कर्म श्रेष्ठतेवरुन ठरत असते.

Trending