Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | 2 killed in accident in Dhule; Attack on collector's car

धुळ्यात अपघातात २ ठार; जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक, बालंबाल बचावले

प्रतिनिधी | Update - Aug 11, 2018, 10:07 AM IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महामार्गावर आंदोलन के

  • 2 killed in accident in Dhule; Attack on collector's car

    धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महामार्गावर आंदोलन केले. या वेळी नाशिक येथे बैठकीसाठी निघालेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. वाहनात जिल्हाधिकारी असल्याची जाणीव झाल्यानंतर जमाव शांत झाला. पोलिस येईपर्यंत जिल्हाधिकारी रेखावार यांनी संतप्त जमावाची समजूत काढून त्यांना थोपवून ठेवले. तसेच त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर याच वाहनाने जिल्हाधिकारी रेखावार नाशिकला रवाना झाले.


    आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नाशिक येथील आयुक्त कार्यालयात बैठक होती. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार सकाळी आठ वाजेच्या सुमारास शासकीय वाहनाने (एमएच १९ एजे ७२७१) नाशिकला निघाले होते. त्याच वेळी मुंबई-अाग्रा महामार्गावरील आर्वी गावाजवळ अपघात झाला होता. या अपघातात ट्रकने चिरडल्यामुळे हिलाल बारकू मासुळे व लक्ष्मण भिका गवळी हे ठार झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी महामार्गावर वाहतूक रोखून आंदोलन सुरू केले होते. आर्वी शिवारातील रोकडोबा हनुमान मंदिरासमोरून काही अंतर पुढे महामार्गावर जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह त्यांच्या वाहनचालकाला जमाव दिसला. जमावाला पाहून चालकाने वाहन थांबवण्यापूर्वीच संतप्त जमावातील अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकारी रेखावार यांच्या वाहनाकडे दगड भिरकावला.


    सुदैवाने या घटनेत जिल्हाधिकारी रेखावार तसेच त्यांचे वाहनचालक यांच्यापैकी कुणीही जखमी झाले नाही. त्यानंतर रेखावार यांनी पोलिस अधीक्षक विश्वासराव पांढरे यांच्याशी संपर्क साधला. तसेच अपघातामुळे रस्त्यावर आलेल्या जमावाची त्यांनी समजूत काढली. त्यानंतर पोलिस अधीक्षक पांढरे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ५ ऑगस्टला खासदार डाॅ. हिना गावित यांच्या वाहनावर असाच हल्ला करण्यात आला होता.

Trending