आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कॉलनीतूनच २ लाखांचे दागिने लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


 औरंगाबाद- वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस कॉलनीतील एका घरातून दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

रमेश जगन्नाथ चव्हाण व त्यांची पत्नी दोघेही कामावर गेले होते. मोठी मुलगी पूजा कॉलेजमध्ये व लहान मुलगी पायल शाळेत गेली होती. पूजा सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरी परतली असता तिला घराचे कुलूप व कपाट उघडे दिसले. पूजाने ही माहिती आई-वडिलांना दिली. त्यांनी तत्काळ घर गाठून पाहणी केली असता कपाटातील २ तोळ्यांची सोनसाखळी, ३ तोळ्यांची पोत व ११ गॅमचे नेकलेस असा एकूण ६ तोळ्यांचा अंदाजे दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याचे लक्षात आले. ही माहिती पोलिस उपनिरीक्षक डी. बी. कोपणार व पोलिस हेड कॉन्स्टेबल रामदास गाडेकर यांना दिली.

 

बंद दरवाजाला लावलेले कुलूप हे चावी न लावतासुद्धा उघडत हेाते. चव्हाण यांच्या कुटुंबीयांसह परिचितांना माहिती होती. घटना घडली त्या वेळीसुद्धा कुलूप न तोडता ते काढून कपाटातील सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्यामुळे या घटनेत परिचित व्यक्तीचाच हात असावा, अशी दाट शक्यता पोलिस प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...