Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | 2 lakhs citizen brought water from the Mahashramadan in 2 years

वाॅटर कप : २ वर्षांत २ लाख शहरवासीयांनी महाश्रमदानातून आणली जलश्रीमंती

अतुल पेठकर | Update - May 13, 2019, 09:12 AM IST

दुष्काळावर मात करण्यासाठी अभिनेता अामिर खानच्या पाणी फाउंडेशनने हाती घेतलेल्या माेहिमेला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद

 • 2 lakhs citizen brought water from the Mahashramadan in 2 years

  नागपूर - अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या वाॅटर कप स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी १ मे रोजी पाणी फाउंडेशनतर्फे शहरवासीयांसाठी महाश्रमदान आयोजित करण्यात येते. गावखेड्यात जाऊन श्रमदान करण्यासाठी संकेतस्थळावर “जलमित्र’ म्हणून उत्साहाने नोंदणी होते, असे सांगतानाच दोन वर्षांत सुमारे दोन लाख शहरवासीयांनी महाश्रमदान करून जलश्रीमंती आणण्यात योगदान दिल्याची माहिती पाणी फाउंडेशनच्या सीईओचे कार्यकारी सहायक सागर कुनसावळीकर यांनी दिली.
  महाराष्ट्रात आमिर खानचे पाणी फाउंडेशन, नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे “नाम’ फाउंडेशन तसेच राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानातर्फे गावखेड्यात दुष्काळ निवारणासाठी कामे केली जातात. पाणी फाउंडेशनच्या कामात गावकरी उत्साहाने सहभागी होतात. कालांतराने शहरवासीयांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. २०१८ मध्ये राज्यातील ७५ तालुक्यांत स्पर्धा झाली, तर २०१९ मध्ये हा आकडा ७६ आहे. २०१९ मध्ये ४७०६ गावे वाॅटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत, तर २०१८ मध्ये ४०२५ गावे सहभागी झाली होती. २०१९ च्या स्पर्धेसाठी २५,११७ जणांना प्रशिक्षण देण्यात आले, तर २०१८ च्या स्पर्धेत २०,०६० लोकांनी प्रशिक्षण घेतले होते.

  सेलिब्रिटींचा लक्षणीय सहभाग
  वाॅटर कप स्पर्धेचे चांगले परिणामही आता दिसायला लागले आहे. वाॅटर कप स्पर्धेत सहभागी होऊन लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक हिंदी व मराठी सेलिब्रिटी येत असतात. राज्यात गेल्या तीन वर्षांत आमिर खान, शाहरुख खान, आलिया भट्ट, आशुतोष गोवारीकर, अजय-अतुल, रणबीर कपूर, सई ताम्हणकर, सुनील वर्बे, जितेंद्र जोशी, अनिता दाते, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, अंकुश चौधरी, भारत गणेशपुरे, किरण राव, गायत्री दातार, अभिजित गोखले आदी सेलिब्रिटींनी श्रमदानात सहभागी होऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढवला आहे.

  मराठवाड्यासह २४ जिल्ह्यांतील ७६ तालुके सहभागी
  २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांतील २१ तालुके, उत्तर महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांतील १० तालुके, िवदर्भातील ७ जिल्ह्यांतील २५ तालुके आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील २० तालुके सहभागी झाले आहेत. महाश्रमदानात ८,७३१ गावांतील गावकऱ्यांनी योगदान दिल्याचे कुनसावळीकर यांनी सांगितले. २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांतील २१ तालुके, उत्तर महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांतील १० तालुके, िवदर्भातील ७ जिल्ह्यांतील २५ तालुके आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील २० तालुके सहभागी झाले आहेत. महाश्रमदानात ८,७३१ गावांतील गावकऱ्यांनी योगदान दिल्याचे कुनसावळीकर यांनी सांगितले.

  वर्गवारीनुसार माहिती नाही :

  महसूल विभागनिहाय तसेच स्त्री व पुरुष वर्गवारीनुसार सहभागी शहरवासीयांची माहिती देण्यात कुनसावळीकर यांनी असमर्थता व्यक्त केली. अनेक जण उत्साहाच्या भरात नोंदणी तर करतात, पण नंतर काही ना काही कारणांनी सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही वर्गवारी केली नाही. जे प्रत्यक्षात सहभागी झाले त्यांचीच माहिती दिल्याचे कुनसावळीकर यांनी स्पष्ट केले.

Trending