आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन करून बोलावले मैत्रिणीला, दोघांनी एकमेकींचे हात बांधून मारली मृत्यूची उडी, 4 दिवसांनी या अवस्थेत आढळली डेडबॉडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धौलपूर (राजस्थान) - 1 डिसेंबर रोजी घरातून गायब झालेल्या दोन महिलांचे मृतदेह बुधवारी संध्याकाळी चंबल नदीत आढळले. दोघी एकमेकींच्या शेजारणी होत्या. पोलिस निरीक्षक कुलदीप चारण म्हणाले की, भिंडच्या राहणाऱ्या या महिलांचे लग्न धौलपूर जिल्ह्यात झाले होते.

 

असे आहे प्रकरण... 

लग्नानंतर दोघीही बजरंग कॉलनीत समोरासमोर राहू लागल्या. एक डिसेंबर रोजी खुशबू (25) आपल्या सासूसोबत दुपारी 1 वाजता बाजारात गेली. तेथे तिने आपली शेजारीण प्रीति (27) ला बोलावले. संध्याकाळी 4 वाजता खुशबू आपल्या सासूला चकवा देऊन प्रीतिसोबत गायब झाली. दोघी गायब झाल्यानंतर खुशबूच्या सासऱ्याने निहालगंज पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. सासरा म्हणाला की, घटनेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या मोबाइलवर खुशबूचा फोन आला. त्यावर त्यांना खुशबू आणि प्रीतीने आत्महत्या करण्याची धमकी दिली. धमकीनंतर खुशबूने फोन कट केला. निहालगंज पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स काढल्यावर दोघींचे लोकेशन चंबल नदीच्या रेल्वे पुलाजवळ आढळले. या प्रकरणाचा तपास करत असलेले एएसआय हीरा सिंह यांनी पाणबुड्यांना बोलावून चंबल नदीतून दोघींचे मृतदेह बाहेर काढले. 


भिंडमध्ये होते दोन्ही महिलांचे माहेर
काढण्यात आलेल्या दोन्ही मृतदेहांचे हात एकमेकांना बांधलेले होते. दोन्ही शेजारणी महिला एमपीमध्ये एकाच ठिकाणच्या राहणाऱ्या होत्या. यामुळे त्यांच्यात जवळीक होती. महिलांचे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येची नोंद करून अधिक तपास सुरू असल्याचे म्हटले.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...