आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटनाबदलाच्या मागणीसाठी सँटियागोत 2 लाख लोक रस्त्यावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सँटियागो - चिलीत मेट्रोच्या दरवाढीविरोधातील निदर्शने मोठ्या आंदोलनाचे रूप घेत आहे. राजधानी सँटियागोमध्ये २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पुन्हा रॅली काढली. त्यांनी राज्यघटना बदलण्याची मागणी केली. ४५ वर्षांपूर्वी लष्करी राजवटीच्या काळात दुसऱ्या देशात गेलेले लोकही या रॅलीत सहभागी झाले होते. चिलीत १९७४ मध्ये अगस्तो पिनोचेट यांनी सत्ता आपल्या हातात घेतली. तेव्हापासून १९९० पर्यंत सैन्य शासन होते. निदर्शकांनी सांगितले की, आज चिलीच्या रस्त्यांवर सैन्याला पाहून जुन्या सैन्य सत्तेची आठवण झाली. तेव्हा हजारो नागरिकांना विशेषत: तरुणांना देश सोडून जावे लागले होते. चिलीची सध्याची राज्यघटना जनरल पिनोचेट यांच्या शासनकाळातच एका लहान आयोगाने लिहिली होती. निदर्शकांनी सांगितले की, नवीन राज्यघटना लिहिण्यासाठी लोकांचे मत जाणून घ्यायला हवे.  - काही ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. निदर्शकांनी पोलिसांवर पेट्रोल आणि रॉकेट बॉम्ब फेकले. यामुळे १० पेक्षा जास्त महिला पोलिस जखमी झाल्या. चिलीत एक महिनापूर्वी निदर्शने सुरू झाली. - अर्थमंत्री इग्नासियो ब्रॉयन्स यांनी सांगितले की, निदर्शनांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...