आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये नौदलाच्या कोची बेसवर हेलिकॉप्टरच्या हँगरचा दरवाजा कोसळला, दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - कोची येथील नौदलाच्या बेसमध्ये गुरुवारी झालेल्या एका अपघातात दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात सकाळी 10 वाजता दक्षिण नेवल कमांडच्या हेडक्वार्टरमध्ये झाला. दोन्ही चीफ पेट्टी ऑफिसर हेलिकॉप्टर हँगरसमोर उभे होते. त्याचवेळी हँगरचा दरवाजा त्यांच्यावर कोसळला. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही. 


संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या अपघाताच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या प्रकरणात कोर्ट ऑफ इनक्वायरीचे अदेश देण्यात आले. सध्या नौदजलाकडून काहीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच मृत अधिकाऱ्यांची नावेही समोर आलेली नाहीत. पण मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...