आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळचे ९ पैकी २ कोरोना पॉझिटिव्ह, सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील दहा जण गेले होते दुबई पर्यटनाला, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू
  • पळालेल्या चौघांवर गुन्हे, नागपुरात अजून एक बाधित

यवतमाळ - दुबईहून परत आलेल्या शहरातील ९ जणांना गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या ९ जणांपैकी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. उर्वरित ७ जणांचे नमुने मात्र निगेटिव्ह आले आहेत. ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासन हाय अलर्ट झाले असून, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील १० जण दुबई येथे गेले होते. तेथून १ मार्च रोजी ते परत यवतमाळ येथे आले होते. या कुटुंबातील एक मुलगा पुणे येथे थांबला होता. तो मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या यवतमाळ येथील उर्वरित ९ जणांशी प्रशासनाने ११ मार्च रोजी संपर्क केला. त्यानंतर त्यांना १२ मार्च रोजी रुग्णालयातील आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. नगरमधून कोरोनाचे तीन संशयित रुग्ण पळाले:  जिल्हा रुग्णालयातील कोरोना व्हायरसचे तीन संशयित रुग्ण पळून गेल्याचे शनिवारी समोर आले. दरम्यान, हे रुग्ण स्वतःहून तपासणीसाठी आल्याची माहिती समोर येत आहे. आता कोरोनाचे हे संशयित रुग्ण कोण आहेत, याचा तपास करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.पळालेल्या चौघांवर गुन्हे, नागपुरात अजून एक बाधित

नागपूर - कोरोना िवषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना सुरू असताना नागपुरात आणखी एक व्यक्ती कोरोना बाधित झाल्याने रुग्णांची संख्या चार झाली आहे. दरम्यान, उपचारांची अथवा कोरोना चाचणी अहवालाची प्रतीक्षा न करता मेयो रुग्णालयातून पळून जाणाऱ्या चार रुग्णांवर अखेर महाराष्ट्र राज्य साथ रोग प्रतिबंधक  कायदा १९९७ अन्वये नागपुरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार शनिवारी सायंकाळी  मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे त्या चार संशयित रुग्ण आणि विरुद्ध महाराष्ट्र राज्य साथरोग प्रतिबंधक कायदा कलम २,३,४  अन्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थितीत निर्देशांचे पालन व्हायलाच हवे अशी अपेक्षा विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी चार संशयित रुग्ण आले होते. या चारही जणांचे रक्त आणि थुंकीचे नमुने घेण्यात आले. चाचणी अहवाल शनिवारी दुपारपर्यंत अपेक्षित होता. रात्री साडेदहाच्या सुमारास रुग्णालय प्रशासनाने काही इतर रुग्णांना सुटी दिली. त्यावेळी आम्हालाही सुट्टी द्या, अशी हुज्जत या रुग्णांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांसोबत घातली होती. रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे काहीही न ऐकता या चारही संशयित रुग्णांनी आपले घर गाठल्याने खळबळ माजली. जिल्हा प्रशासन आणि रुग्णालयाचे अधिकारी तर अक्षरशः हादरले होते. शनिवारी दुपारपर्यंत या चारही जणांना रुग्णालयात आणले गेले. चौघांचेही वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आहेत, हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...