आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार, एक गंभीर; ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - भरधाव वेगात ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. राजूर रोडवरील गौरीशंकर पोल्ट्री फार्मजवळ शनिवारी रात्री हा अपघात झाला.   

 


बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील महेश बजरंग जांगीड (२२), लेखराज जांगीड (२७) आणि नरेश जांगीड (२७) हे तिघे बुलेटवरुन (एम.एच.२१ यु.व्ही.३६३९) ने राजूर येथे दर्शनासाठी निघाले हाेते. दरम्यान, गौरीशंकर पोल्ट्री फार्मजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम.एच.१९ झेड. ५४२८) जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील महेश आणि लेखराज गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर नरेश जांगीड गंभीर जखमी झाला. जखमीला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याप्रकरणी महावीर प्रेमसुख बाफना यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास आटोळे  करत आहेत.   

 

विवाहाची सुरू होती बोलणी

या अपघातातील मृत्यू झालेले महेश आणि लेखराज हे मुळचे राजस्थान येथील आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते केळीगव्हाण येथे वास्तव्यास होते. महेश जांगीड याच्या लग्नाची तयारी सध्या सुरु होती. दोन दिवसांपूर्वीच राजस्थान येथील काही पाहुणे त्यांच्याकडे लग्नाची बोलणी करण्यासाठी येऊन गेले होते. आता काही दिवसांतच महेशही राजस्थान येथे जाणार होता. मात्र तत्पूर्वीच अपघातात त्याला मृत्यूने गाठले. त्यामुळे जांगीड परिवारावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...