आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Punjab Girls Write Letter With Blood To President Kovind Seeking Help And Demanded Euthanasia

दोन मुलींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवले रक्ताने लिहीले पत्र, म्हणाल्या- 'न्याय मिळणार नसेल तर मरण्याची परवानगी द्या'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगा(पंजाब)- शहरातील दोन मुलींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रक्ताने पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी लिहीले- जर न्याय मिळणार नसेल तर, संपूर्ण कुटुंबाला मरण्याची परवानगी द्यावी. त्या दोघींविरोधात मोगा पोलिसांनी कलम 420 अंतर्गत फसवणे आणि पैशांची हेराफेरी करण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. पण त्या दोघींना आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे.

 


कोणतीच अधिकृत सूचना नाही- पोलिस
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले- 'मी ऐकले आहे की, त्यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहीले आहे. पण मला याबाबत कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाहीये. आम्ही लवकरच प्रकरणाची चौकशी करू.'

 

मुलींचा आरोप- 'आम्हाला अडकवण्यात आले आहे. आम्ही अधिकाऱ्यांना चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी आमचे म्हणने ऐकूणच घेतले नाहे. आमचे कुटुंबीय भीतीत आहेत. '