आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबगदाद , तेहरान : इराकमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणी हल्ल्यांच्या २४ तासांत बगदादमध्ये बुधवारी उशिरा रॉकेटने हल्ला झाला. या हल्ल्यात दोन रॉकेट कडेकोट सुरक्षा ग्रीन झोनमध्ये कोसळले. याच भागात अमेरिकेचे राजदूत कार्यालय आहे. त्यात हानी झाली नाही. हल्ल्यामागे इराण समर्थक शिया बंडखोर हाशेद या संघटनेचा हात असावा, असा अमेरिकी अधिकाऱ्यांचा संशय आहे. इराणच्या रिव्होल्युश्नरी गार्डचे कमांडर अब्दुल्ला अरगाही म्हणाले, इराण भविष्यात अमेरिकेचा मोठा सूड उगवणार आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील युद्ध जाहीर करण्यासंबंधीच्या शक्ती मर्यादित करण्यासाठी मतदान होणार आहे. कनिष्ठ सभागृहात सभापती नॅन्सी पॅलोसी यांनी बुधवारी याबद्दलची माहिती दिली. ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेनंतर पॅलोसी यांचे वक्तव्य जारी झाले आहे. इराण युद्धाबाबतच्या ट्रम्प यांच्या धोरणाच्या विराेधात उशिरा अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात मतदान घेतले जाणार आहे.
इराणची आर्थिक स्थिती- अंतर्गत परिस्थिती वाईट, अमेरिकेत यंदा निवडणूक असल्याने दोन्ही देश युद्ध टाळताहेत
आखातात युद्ध शक्यता वाटते?
इराण व अमेरिकेला युद्ध नकोय. म्हणूनच तणाव कमी करण्यासाठी पावले उचलताना दिसतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची वक्तव्ये व इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यातूनही हे दिसून आले. आर्थिक व अंतर्गत परिस्थिती वाईट असल्यानेदेखील इराणला पीछेहाट महत्त्वाची वाटते. अमेरिकेतील लोकांनाही युद्ध नकोय, असे ट्रम्प यांनी पूर्वी अनेकदा म्हटले होते. तेथे यंदा निवडणूक आहे. युद्ध झाल्यास ट्रम्प यांना जनतेस उत्तर द्यावे लागेल. हे महत्त्वाचे आहे.
इतर देशांना काय वाटते?
इराणचा इतिहास पाहिल्यास तार्किक निर्णय घेणारा देश अशी त्याची आेळख आहे. आखातात तणाव करण्यात त्याला जास्त फायदा वाटतो. चीन, रशिया, सौदी अरेबिया, इस्रायल, युरोपीय देशांनाही युद्ध नकोय. म्हणूनच ते वारंवार शांतता, संयम बाळगण्याचा सल्ला देत आहेत. कारण जगातील कोणत्याही देशाला युद्ध परवडणारे नाही. तशी परिस्थिती नाही. इराण व अमेरिका यांच्यात थेट चर्चा शक्य आहे. तिसऱ्या पक्षाची गरज नाही. परंतु इराणने बेजबाबदार पाऊल उचलल्यास इतर देशही विरोधात जातील.
भारताची स्थिती,दृष्टिकोन आहे?
आखातात तणाव कमी होणे भारतासाठी सर्व दृष्टीने फायदेशीर ठरणारे आहे. आखातात भारतीयांची मोठी संख्या आहे. त्यामुळेच या लोकांना हलवण्याची तयारी सुरू आहे. मात्र तूर्त तशी वेळ आलेली नाही. भारतात सर्वाधिक पैसा व तेलाची आयात इराणमधूनच होते. त्यातही इराकची स्थिती चिंताजनक आहे. इराक भारताचा दुसरा मोठा तेल निर्यातदार देश आहे.
इराणचे नेते, लष्कर अमेरिकेच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्ये का करताहेत ?
इराणचे लष्कर व नेते सातत्याने अमेरिकेच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्ये देत आहेत. देशातील जनतेचा संताप कमी करण्यासाठी तशी वक्तव्ये दिली जात आहेत. त्याशिवाय हे नेते इतर अनेक देशांतील बंडखोर गटांना पाठिंबा देतात. त्यादृष्टीनेदेखील वक्तव्ये दिली जातात. काही इराणी समर्थित गटांनी अमेरिकेच्या ठिकाणांवर हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यांना सूड घेण्याची इच्छा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.