आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून शाळेत जात असलेल्या दोन मुलींचे अपहरण करून बलात्कार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली जवळील फरीदाबादमध्ये घरातून शाळेत जात असलेल्या दोन मुलींचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करून त्यांच्यावर कलम 363, 366, 4 पोक्सो अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

मुलींच्या घरच्यांना माहिती मिळाली की, त्यांच्या दोन मुलींचे अपहरण झाले आहे, त्यानंतर ते लगेच शाळेत गेले तेथे त्यांना कळाले की, त्यांच्या मुली शाळेत आलेल्याच नाहीत. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी एनआयटी-6 मधील सरदार गेस्ट हाउसमधून दोन मुलांना दोन मुलींसोबत पकडले. दोघांपैकी एक आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी सांगितले की, एका मुलीसोबत बलात्कार झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...