आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 पत्र अन् शिक्षकच घेऊ लागला विद्यार्थिनीचा गैरफायदा, तिची मजबुरी पाहून दुसऱ्या शिक्षकाशी संबंध ठेवायला भाग पाडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोपड (पंजाब) - गुरूला समाजात ईश्वरापेक्षा मोठा दर्जा आहे. परंतु एक शिक्षकच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. तसे तर शिक्षकांकडून विद्यार्थिनींच्या छेडछाडीची प्रकरणे नेहमीच समोर येतात. रोपडच्या एका सरकारी उच्च माध्यमिक शाळेच्या दोन शिक्षकांवर 11वीच्या विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे.

 

शिक्षक अन् विद्यार्थ्याने मिळून केला मुलीवर बलात्कार
पीडित विद्यार्थिनीची मैत्री तिच्याच वर्गातील एका मुलाशी होती. यादरम्यान मुलगा पीडित मुलीला पत्रही लिहू लागला होता. यादरम्यान एक पत्र आरोपी शिक्षकाच्या हाती लागले. याच आधारावर तो अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करू लागला. या कुकृत्यात त्याने शाळेच्याच दुसऱ्या शिक्षकालाही सामील केले. मग दोघेही मिळून ब्लॅकमेल करून विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण करू लागले.

 

प्रिन्सिपलने कोणतीही अॅक्शन घेतली नाही
ही गोष्ट जेव्हा पीडितेच्या कुटुंबीयांना कळली तेव्हा त्यांनी प्रिन्सिपलकडे तक्रार केली. त्यांनी डीईओना पत्र लिहून दोन्ही शिक्षकांच्या बदलीची मागणी केली. दुसरीकडे, जेव्हा डीईओशी बोलणे झाले तेव्हा त्यांनी चेंडू प्रिंसिपलकडे टोलवत म्हटले की, अॅक्शन घेण्याचा अधिकार प्रिन्सिपलला देण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आरोपी शिक्षकांची बदली नाही, तर त्यांना नोकरीवरूनच काढून टाकावे. जेणेकरून ते पुन्हा असे कृत्य करणार नाहीत.


आरोपी वेगवेगळ्या जागी भेटायला बोलवायचे, त्रस्त होऊन मुलीने घरच्यांना सांगितले
पीडित विद्यार्थिनी इयत्ता 11वीत शिकते आणि त्याच वर्गातील एका मुलाशी तिची मैत्री झाली होती. एक दिवस विद्यार्थिनीकडून लिहिण्यात आलेले एक पत्र आरोपी शिक्षकाच्या हाती लागले. यावर त्या शिक्षकाने विद्यार्थिनीची समजूत घालून कुटुंबीयांना कळवण्याऐवजी स्वत:च ब्लॅकमेल करणे सुरू केले. यात त्याने एका शिक्षकालाही सामील केले. यानंतर दोन्ही शिक्षकांनी मुलीशी बोलण्यासाठी तिला मोबाइल आणि सिम कार्ड खरेदी करून दिला. मग दोन्ही आरोपी मुलीला वेगवेगळ्या जागेवर भेटायला बोलवायचे. यामुळे त्रस्त होऊन पीडितेने जेव्हा ही गोष्ट घरच्यांना सांगितली तेव्हा ते गावकऱ्यांना घेऊन शाळेत पोहोचले. परंतु तोपर्यंत दोन्ही आरोपी शिक्षक तेथून फरार झालेले होते.


काय म्हणतात जबाबदार अधिकारी?

 

डीईओंना लेखी माहिती कळवली आहे : प्रिन्सिपल

घटनेबद्दल जिल्हा शिक्षण अधिकारी (डीईओ) यांना लेखी स्वरूपात माहिती दिली आहे. दोन्ही आरोपी शिक्षकांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच याप्रकरणी अॅक्शन घेतली जाईल.' -प्रिंसिपल, सीनियर सेकेंडरी स्कूल


प्रिंसिपलच घेऊ शकतात अॅक्शन : डीईओ 
सरकारी शाळेतील ही घटना निंदात्मक आहे. अशा प्रकरणांत अॅक्शन घेण्याचे सर्व अधिकार पंजाब शिक्षण विभागकडून शाळेच्या प्रिंसिपलला देण्यात आलेले आहेत. प्रिंसिपलला रिपोर्ट सादर करण्यासाठी सांगण्यात आले आहे.' -शरनजित सिंह, डीईओ  

 

 

बातम्या आणखी आहेत...