Home | National | Other State | 2 terrorists killed in an encounter in budgam of jammu kashmir

काश्मीरात चकमक: दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, 4 दिवसांत एनकाउंटरमध्ये 8 दहशतवाद्यांचा खात्मा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 13, 2019, 12:09 PM IST

एनकाउंटरनंतर परिसरात स्थानिकांनी निदर्शने सुरू केली.

  • 2 terrorists killed in an encounter in budgam of jammu kashmir

    श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी चकमक उडाली. यामध्ये जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनकाउंटरनंतर परिसरात स्थानिकांनी निदर्शने सुरू केली. त्यामुळे, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तत्पूर्वी मंगळवारी पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात हिज्बुलचा एक दहशतवादी आणि सोमवारी कुलगाम येथे पाच दहशतवादी ठार मारले गेले. अर्थातच गेल्या 4 दिवसांच्या कारवायांमध्ये जवानांनी 8 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

    स्थानिकांची निदर्शने...
    > पोलिस प्रवक्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "चदुराच्या गोपालपारा परिसरामध्ये दहशतवादी दबा धरून बसल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री शोध मोहिम राबवण्यात आली. त्याच दरम्यान पोलिस जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यास प्रत्युत्तर दिले असता जोरदार चकमक उडाली. यामध्ये सकाळपर्यंत 2 दहशतवादी ठार झाले."
    > पोलिसांनी पुढे सांगितले, की दहशतवादविरोधी कारवाई किंवा एनकाउंटर झाल्यानंतर त्या ठिकाणी बॉम्ब पेरल्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे, प्रत्येकवेळा मोहिम संपल्यानंतर ते ठिकाण सुरक्षित केले जाते. तोपर्यंत नागरिकांना आत प्रवेश दिला जात नाही. परंतु, काही स्थानिक उत्सुकतेच्या भरात त्या ठिकाणी पोहोचतात. गेल्या वर्षी अशाच प्रकारच्या एका कारवाईनंतर काही लोकांनी हीच चूक केली आणि अचानक बॉम्बस्फोट घडला. त्या दुर्घटनेत अनेकांचा जीव गेला होता. दरम्यान, बुधवारच्या चमकीनंतर सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केली आणि पोलिसांसोबत वाद घातला. यानंतर निदर्शने सुद्धा सुरू करण्यात आली. त्यामुळे, परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Trending