National / सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकित जैशचे 2 दहशदवादी ठार, 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात होते सामिल


17 जूनला पुलवामात झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या 9 पैकी 2 जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू

दिव्य मराठी वेब

Jun 18,2019 05:01:43 PM IST

श्रीनगर- अनंतनागमध्ये सुरक्षादलासोबत झालेल्या चकमित मंगळवारी जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशदवादी मारले गेलेत. दहशदवादी सज्जाद मकबूल भट आणि तौसीफ या दोघेही 14 फेब्रुवारीला झालेल्या पुरवामा हल्ल्यात सामिल होते. या हल्ल्यात एक जवानदेखील शहीद झाला आहे. यावेळी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून हत्याचे जप्त केले. मागील 24 तासात या परिसरात मेजर केतन शर्मासहित चार जवान शहीद झाले आहेत, तर तीन दहशदवादी मारले गेले आहेत.


पुलवामाच्या अरिहल गावात सोमवारी 44 राष्ट्रीय रायफल्सच्या बुलेटप्रुफ गाडीवर झालेल्या आयईडी ब्लास्टमध्ये 9 जवान जखमी झाले होते. यात उपचारादरम्यान मंगळवारी दोन जवान हवलदार अमरजीत सिंग आणि नायक अजीत कुमार साहू यांना वीर मरण आले.


सोमवारी अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत मेजर केतन शर्मा शहीद झाले होते, तर तीन जवान जखमी झाले होते. यावेळी सुरक्षा दलाने एका दहशदवाद्यालाही कंठस्नान घातले होते. अधिकाऱ्यांन सोमवारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या परिसराताली इंटरनेट आणि मोबाईल सुविधांना बंद केले होते.


31 मेपर्यंत 101 दहशदवादी मारले गेले
अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, यावर्षी 31 मेपर्यंत 101 दहशदवादी मारले गेले आहेत. यात 23 परदेशी आणि 78 स्थानीक स्थानिक दहशदवाद्यांचा समावेश आहे. यात अल-कायदाची संघटना अंसार गजवत-उल-हिंदचा कथित प्रमुख झाकिर मूसाचादेखील खात्मा झाला आहे. तर, मार्चपर्यंत 50 तरूणांनी दहशदवादी संघटनेत प्रवेश केला आहे.

X
COMMENT