आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 White Giraffes Of Rare Breed Were Killed By Poachers, There Were Only Three In The World

दुर्मिळ जातीच्या 2 पांढऱ्या जिराफांना शिकाऱ्यांनी मारले, जगात असे फक्त तीन होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मादा आणि त्याच्या बछड्याचे मृतदेह उत्तर-पूर्व केनिया ग्रासिया काउंटीमध्ये आढळले

नैरोबी- उत्तर-पूर्व केनियाच्या ग्रासिया काउंटीमध्ये शिकाऱ्यांनी दुर्मिळ अशा दोन पांढऱ्या जिराफांची शिकार केली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्या दोन्ही जिराफांचे मृतदेह आढळले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या जातीचे जगात फक्त तीन जिराफ होते, आता फक्त एक बाकी आहे. 


जानकारांचे म्हणने आहे की, हा पांढरा रंग ल्यूसीज्म नानाच्या एका दुर्मिळ परिस्थितीमुळे होते. यामुळे त्यांच्या पेशांमध्ये रंग (पिगमेन्टेशन) येत नाही. या पांढऱ्या जिराफांचे फोटो 2017 मध्ये व्हायरल झाले होते. इशाकबीनी हिरोला कम्युनिटीचे प्रबंधक मोहम्मद अहमदनूरने सांगितले की, मृत जिराफांनी शेवटचं तीन महिन्यांपूर्वी पाहण्यात आलं होतं. ही आमच्या समाजासाठी आणि केन्यासाठी सर्वात दुखद घटना आहे. संपूर्ण जगात फक्त आमची कम्युनिटी या पांढऱ्या जिराफांचे संरक्षण करते.

पोलिसांनी सांगितले की, अद्याप या जिराफांना मारणाऱ्यांची माहिती मिळाली नाहीये. केन्या वाइल्डलाइफ सोसाइटी या प्रकरणाचा तपास करत आहे. सेन्चुअरीमध्ये फेंसिंग नाहीये, यात अनेक गावे येतात. 

बातम्या आणखी आहेत...