आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 2 Women Below 50 Enter Sabarimala Temple, A First After SC Ended Ban

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सबरीमालात प्रथमच प्रतिबंधित वयाच्या 2 महिलांनी प्रवेश करून घेतले मंदिराचे दर्शन, Video जारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - कित्येक दशकांची बंदी मोडीस काढत 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या दोन महिलांनी केरळच्या सबरीमालात प्रवेश केला. सुप्रीम कोर्टाने बंदी हटवल्याचे आदेश दिल्यानंतर प्रथमच दोन महिलांनी मंदिराचे दर्शन घेऊन परतल्याचा दावा केला आहे. या मंदिरात मासिक धर्म असलेल्या महिलांना प्रवेश दिला जात नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर सुरक्षा बंदोबस्त लावल्यानंतर सुद्धा येथे विशिष्ट वयोगटातील महिलांना मज्जाव करण्यात आला होता.

 

शक्यच नाही, असेल तर कारवाई करू -अय्यप्पा धर्म सेना

चाळीशीत असलेल्या या महिलांनी सबरीमालात प्रवेश करताना आणि बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ सुद्धा बनवला. तो व्हिडिओ काही प्रसार माध्यमांनी दाखवला आहे. यात काळ्या कपड्यांमध्ये दोन महिला पोलिसांच्या संरक्षणात मंदिरात प्रवेश करताना दिसून येत आहेत. यासोबतच, व्हिडिओमध्ये निदर्शने करणारे लोक सुद्धा दिसून आले. अय्यप्पा धर्म सेनेचे नेते राहुल ईश्वर यांनी महिलांचा दावा धुडकावून लावला आहे. "हे खरे असेल असे मला वाटत नाही. त्यांनी हा प्रवेश अतिशय गुप्तपणे केला असावा. एकदा आमच्या हाती माहिती आली की योग्य कारवाई केली जाईल.

 

#WATCH Two women devotees Bindu and Kanakdurga entered & offered prayers at Kerala's #SabarimalaTemple at 3.45am today pic.twitter.com/hXDWcUTVXA

— ANI (@ANI) January 2, 2019

 

पहाटे 3:45 वाजता केला प्रवेश
या दोन्ही महिलांनी पाम्बा बेस कॅम्पमधून मध्यरात्रीनंतर अय्यप्पा मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू केला. तसेच पहाटे पावणे चार वाजता त्यांनी भगवान अयप्पाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. त्यावेळी अतिशय कमी लोक होते. सोबतच, माध्यम सुद्धा उपस्थित नव्हते. त्यामुळे, महिला लवकरात-लवकर मंदिरात प्रवेश करून परत येऊ शकल्या. या संपूर्ण प्रक्रियेत महिलांसोबत काही पोलिस जवान साध्या गणवेशात होते. याच महिलांनी गेल्या आठवड्यात डिसेंबरमध्ये सुद्धा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कार्यकर्ते आणि आंदोलकांमुळे त्या यशस्वी ठरू शकल्या नाहीत. 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांनी सबरीमालात प्रवेश करू नये असा कार्यकर्ते आणि पुजाऱ्यांचा आग्रह आहे.