Storm / वादळी वाऱ्यात घराच्या पत्र्यांसह उडाला दीड वर्षांचा चिमुकला, 200 मीटर दूर जाऊन पडला; जागीच मृत्यू

झोपडीवरील पत्र्याला मुलाचा झोका बांधण्यात आला, झोक्यासह उडाला चिमुकला

दिव्य मराठी वेब

Jun 13,2019 10:47:00 AM IST

भोपाळ - महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशासह विविध राज्यात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे सुरू आहेत. अशाच वादळी वाऱ्यात मध्य प्रदेशातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बडवानी जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस पडला. यावेळी वादळी वाऱ्यात एका घराचे पत्रे उडाले. या पत्र्यांसह घरातील दीड वर्षांचा चिमुकला देखील उडून तब्बल 200 मीटर दूर फेकल्या गेला. या दुर्दैवी घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. या वादळात गरीब कुटुंबाच्या झोपडीसह अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे बुधवारी तुफान वारे वाहत होते. झोपडीत राहणाऱ्या फोगरा आणि त्याच्या पत्नीला याचा सर्वात मोठा फटका बसला. त्यांच्या झोपडीवर टिन शेड होते. त्याच टिन शेडला या दांपत्याने आपल्या मुलासाठी झोका बांधला होता. या झोक्यामध्ये दीड वर्षांचा मुलगा बुधवारी रात्री झोपलेला होता. त्याचवेळी जोरदार वारे वाहत होते. या वाऱ्यात झोपडीचे छप्पर झोक्यासह उडाले आणि त्यामध्येच चिमुकला झोपलेला होता. उखडलेल्या झोपडीतून आरडा-ओरड करत आई-वडिलांनी आपल्या चिमुकल्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. झोपडीपासून 200 मीटर अंतरावर गंभीर जखमी अवस्थेत मुलगा सापडला. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचणार त्यापूर्वीच मुलाचा जीव गेला होता.

X
COMMENT