आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या मजल्यावरून पडली दोन वर्षांची चिमुकली, आवाज ऐकून वडिल बाहेर आले तेव्हा दिसले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानगड (राजस्थान)- गुरूवारी राक्षी हनुमानगड येथील एक ह्रदयद्रावक घटना घडली. दोन वर्षांची मुलगी थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली असलेल्या फडशीवर पडली. काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून तिचे वडील बाहेर आले तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात होती. वडिलांनी दीड तास मुलाला हॉस्पीटलमध्ये नेण्यासाठी संघर्ष केला. शेवटी एका किरायाच्या गाडीने तिला श्रीगंगानगर येथील हॉस्पीटलमध्ये दाखल केले आणि तिचे प्राण वाचले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बीआर चौधरी टीटी कॉलेजचे विकास बंसल हे कॉलेजच्या तीसऱ्या मजल्यावरच कुटुंबासह राहतात. त्यांची दोन वर्षाची मुलगी पूर्वी तिसऱ्या मजल्यावर खेळत होती. अचानक पाय घसरल्याने ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. पडतानाचा तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. जखमी मुलीला वाचवण्यासाठी बंसल यांनी एकानंतर एक अशा तीन अँबुलंन्सना फोन केला परंतु, सर्व खराब होत्या. शेवटी एका किरायाच्या गाडीनेत्यांनी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला श्रीगंगानगर येथे रेफर करण्यात आले. सध्या चिमुकलीची अवस्था स्थिर आहे. तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
  

 

बातम्या आणखी आहेत...