आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात सुरु होता धार्मिक कार्यक्रम..गरम पाकात पडल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने स्वयंपाक करण्याचे काम सुरू असताना गरम पाकामध्ये पडून गंभीररीत्या भाजलेल्या राजवीर नितीन मेघावाले (२, रा. सुंदर दूध डेअरीच्या पाठीमागे, दलालवाडी) या चिमुकल्याचा रविवारी रात्री सव्वानऊ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

मेघावाले यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने रविवारी दुपारी दीड वाजता स्वयंपाक करण्याचे काम सुरू होते. लाकडी भट्टीवर स्वयंपाक सुरू असल्यामुळे कढईची उंची कमी होती. त्यामुळे राजवीर खेळत खेळत कढईजवळ आला. अचानक त्याचा तोल गेला अन् तो गरम पाकाच्या कढईत पडला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना प्रकृती खालावल्याने त्याला घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री सव्वानऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. नितीन मेघावाले हे कटलरीचा व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले असून एक मुलगा राजवीरपेक्षा मोठा आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक बबन राठोड करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...