आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच पहिल्या कॅबिनेटमध्ये रायगडासाठी 20 कोटी मंजूर, दुपारी मंत्रालयात पदभार स्वीकारतील

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री

मुंबई- शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काल राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तात्काळ त्यांनी कॅबिनेटची बैठक बोलवली होती. पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात रायगड किल्ला संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी आजवर जे केले, नुकसान झाले त्याची माहिती मुख्य सचिवांकडून मागवली आहे. ती आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 'मंत्रिमंडळ सर्व विभागांचे असते, ते एखाद्या विभागाचे नसते, हे ज्यांनी मुख्यमंत्रिपद अनुभवले आहे त्यांना माहिती आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रम सर्व राज्याचे हित लक्षात घेऊनच तयार केला आहे,' असे उत्तर त्यांनी फडणवीस यांच्या टीकेला दिले.बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार हाेणार
 
3 डिसेंबरपर्यंत या सरकारला बहुमत सिद्ध करायचे अाहे. त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार अाहे. शिवसेना, राष्ट्रवादीला एकूण 15, तर काँग्रेसला 13 मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, उद्धव ठाकरे शुक्रवारी दुपारी मंत्रालयात पदभार स्वीकारतील.