आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ : पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे 24 तासांत 20 ठार, 26 वर्षांनी उघडले इडुक्की धरणाचे दरवाजे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये झालेल्या पावसानंतर आलेला पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे 24 तासांत 20 जणांचा मृत्यू झाला. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार इडुक्की जिल्ह्यात 10 लोकांचा जीव गेला. येथील अदिमालीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय वायनाड, पलक्कड आणि कोझीकोडमधून तीन जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे इडुक्की धरण पावसामुळे भरले असून, 26 वर्षांने याचे दरवाजे उघडले आहेत. 

 

Shutters of Idukki Dam in Kerala opened after 26 years! pic.twitter.com/fKWja80SiG

— SK StockTrader (@stocks_sk) August 9, 2018

याआधी इदामालयार धरणाचे चार दरवाजे उघडले होते. त्यात 600 क्युसेक पाणी सोडण्यात आले. राज्याच्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री पी विजयन यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. ते म्हणाले, आम्ही लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलासह एनडीआरएफला बोलावले आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या पोहोचल्या आहेत. आणखी दोन तुकड्या लवकरच येत आहेत. एकूण परिस्थिती पाहता नेहरू ट्रॉफी बोट रेस रद्द केली आहे. 

 


एअरपोर्टवरही भरले पाणी 
कोच्ची एअरपोर्टच्या संचालकांचे म्हणणे आहे की, विमानतळाच्या अनेक भागांत पाणी शिरले आहे. त्यामुळे ते लवकरच बंद केले जाऊ शकते. पुढील सूचनेपर्यंत फ्लाइट लँड होणार नाही. फ्लाइट दुसऱ्या विमानतळाकडे वळवण्यात आल्या आहेत. 

 

कुठे किती ठार

ठिकाण मृत्यू
इडुक्की (जिल्हा) 10
मल्लापुरम 05
कन्नूर 05
वायनाड 05
एकूण 20
   

 

 

 

बातम्या आणखी आहेत...