आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे कोट्याधीश होण्यासाठी लागली आहे लोकांची रांग, करावे लागेल हे छोटेसे काम, अनेकांनी केले प्रयत्न पण मिळाले नाही यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इंटरनॅशनल डेस्क- येत्या काही दिवसांत तुम्ही दुबईला जाणार असाल तर, उशीर करू नका. दुबई एअरपोर्टवरच तुम्ही कोट्याधीश होउ शकता. खरतर, दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर काचेच्या एका बॉक्समध्ये 20 किलो सोन्याचा एक बार ठेवला आहे, याला तुम्ही जिंकू शकता. पण, ते मिळवणे सोपे नाहीये, याला घेण्यासाठी तुम्हाला एका हाताने त्या सोन्याचा बारला काचेच्या बाहेर काढावे लागेल. जर तुम्ही तो बार काढण्यात यशस्वी झालात, तर तो बार तुमचा होईल.


अनेक लोकांनी हा सोन्याचा बार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरले. रिपोर्टनुसार, हा बार आकाराने लहान आणि रेक्टँगुलर शेपमध्ये आहे, पण वजन जास्त असल्यामुळे त्याला एका हाताने कोणीच उचलू शकत नाहीये. 


सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ
सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, या बारला काढण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहे, पण कोणीच तो बार काढू शकत नाहीये.

बातम्या आणखी आहेत...