आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 महिन्यांच्या मुलीला लागला पॅलेट गनचा छर्रा, डोळा निकामी होण्याचा आहे धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - जम्मू-कश्मीरच्या शोपियामध्ये 20 महिन्यांची मुलगी पॅलेट गनची शिकार ठरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना 25 नोव्हेंबरची आहे. मुलगी तिच्या घरात होती तेव्हा तिच्या डोळ्यावर पॅलेट गन छर्रा लागला. तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून तिचा डोळा निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

 

 एन्काऊंटरदरम्यान लागली पॅलेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार मुलीला घराजवळच सुरक्षादल आणि स्थानीक लोकांमध्ये झालेल्या चकमकीत दरम्यान पॅलेट लागली. या चकमकीत एक नागरीकही ठार झाला आहे. 

 

सुरक्षारक्षकांनी केली फायरींग

मुलीच्या आईने सांगितले की, आम्ही घरात होतो. बाहेर आश्रुधुरांच्या नळकांड्या फेकल्या जात होत्या. धुरामुळे माझ्या पाच वर्षाच्या मुलाला श्वास घेण्यासत त्रास होत होता. त्यानंतर मी जेव्हा घराबाहेर जाण्यासाठी दार उघडले तेव्हा 3 सुरक्षारक्षकांनी आमच्यावर पॅलेट गनने फायरींग केली.

 

मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला

जखमी मुलीची आई म्हणाली की, मी मुलीला वाचवण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला. पण तरिही तिला पॅलेट लागली. जर मी हात ठेवला नसता तर तिचा सगळा चेहरा जखमी झाला असता.

 

बातम्या आणखी आहेत...