आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन आरोग्य योजनेतील विमा रकमेपैकी २० टक्के डाॅक्टरांना; परिचारिका, भूलतज्ज्ञांसह इतर कर्मचाऱ्यांनाही लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा कंपनीकडून रुग्णालयांना प्राप्त होणाऱ्या एकूण रकमेपैकी २० टक्के रक्कम तेथील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळणार अाहे. तसेच विमा रकमेतील २५ टक्के रक्कम प्रतिवर्षी शासनाला देण्यात येईल. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला.  


राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऑक्टोबर २०१६ पासून राज्यात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत एकूण ११०० उपचारांचा व १२७ अाजारांच्या पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबेही या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेत समाविष्ट कुटुंबासाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष दोन लाख रुपये तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी हीच रक्कम तीन लाख आहे.  


शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये जन आरोग्य योजनेअंतर्गत वैद्यक सेवा पुरवण्यात येतात.  या रुग्णसेवेसाठी वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणाऱ्या विमा रकमेपैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून रुग्णसेवा पुरवणारे सर्जन, फिजिशियन व इतर, भूलतज्ज्ञ, इतर कन्सल्टंट, वैद्यकीय समन्वयक, स्टाफ नर्सेस, सिस्टर्स, कर्मचारी देण्यात येईल.  

बातम्या आणखी आहेत...