आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग/3 नोव्हेंबरला रिलीज होणार 2.0 चा ट्रेलर, पुढच्या 29 तारखेला रिलीज होणार चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. रजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 चित्रपटाचे ट्रेलर 3 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. एस शंकर यांनी या चित्रपटाचे डायरेक्शन केले आहे. या चित्रपटात डार्क सुपरहीरो डॉ. रिचर्डची भूमिका अक्षय कुमार साकारत आहे. त्याने ट्विट करुन ट्रेलरची रिलीज डेट जाहिर केली. 2.0 हा चित्रपट रजनीकांतच्या रोबेट चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात सायन्स आणि फिक्शनसोबतच भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. भारतीय चित्रपट इतिहासात हा सर्वात जास्त बजेट असणारा चित्रपट आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 

 

वाढदिवशी अक्षयने शेअर केले होते पोस्टर 
आपल्या 51 व्या वाढदिवशी अक्षयने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी त्याच्या कॅरेक्टरचे पोस्टर शेअर केले होते. त्याने हे त्याचे आतापर्यंतचे पावरफुल कॅरेक्टर असल्याचे सांगितले. यासोबतच त्याने लिहिले होते की, ज्या लोकांकडे आवाज नाही, त्यांच्यासाठी मी डार्क सुपरहीरो आहे. 

 

2.0 आहे देशातील सर्वात महागडा चित्रपट 
2.0 देशातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. याचे ओव्हरऑल बजेट 543 कोटी आहे. यामध्ये हेवी वीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. 12 सप्टेंबरला चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता. यामध्ये दाखवण्यात आले की, डॉ. रिचर्ड टेलिकॉक कंपन्यांचा सूड घेण्यासाठी संपुर्ण शहरातील लोकांकडून मोबाइल हिसकावून घेतो. या सीनमध्ये मेकर्सने एक लाख मोबाइल्सचा वापर केला आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी जवळपास 50 कोटी रुपयांचा भव्य सेट उभारण्यात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...