आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 शेतकऱ्यांनी भरलेली नाव पलटल्याने एकाचा मृत्यू तर 2 बेपत्ता, 17 जणांना वाचवण्यात यश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहराइच(उत्तर प्रदेश)- जिल्ह्यातील मिहींपुरवा तहसीलच्या लौकाही गावात आज(रविवार) शेतकऱ्यांनी भरलेली नाव शरयू नदीत पलटली. नावेत बसलेले 20 शेतकरी पेरणीसाठी जात होते. नंतर नाव नदीच्या मधोमध गेल्यावर पलटली. हे पातून किनाऱ्यावर असलेले इतर गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. यातील 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, तर एकाचा मृत्यू झालाय. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणबुड्यांच्या मदतीने दोन बेपत्ता शेतकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. 


पावसामुळे पाणी पातळी वाढली, 50 गावांना सतर्कतेचा इशारा
पावसामुळे महसी तहसील क्षेत्रातील घूरदेवी स्थित स्परवर घाघरा नदीची पाणी पातळी परत एकदा वाढू लागली आहे. पाणी पातळी वाढल्यामुळे 50 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. प्रवाह वाढल्यामुळे नदीलगतची शेत जमीन पाण्याखाली जात आहे. प्रशासनाचे अधिकारी किनाऱ्या लगतच्या गावांमध्ये जाऊन सर्वाना सतर्क करत आहेत. घाघरा नदीची पातळी 110.180 मीटर रेकॉर्ड करण्यात आली आहे. 12 तासात 8 सेमी पातळी वाढली आहे.