आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन मित्रांनी केला सायकलवरून २० हजार किमीचा प्रवास; २३० दिवसांत २७ देशांतून गाठले वर्ल्डकपचे स्टेडियम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओसाका - जपानमध्ये सध्या क्रीडाप्रेमींची अलाेट गर्दी झालेली आहे. या ठिकाणी २० सप्टेंबरपासून रग्बीच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. त्यामुळे जगभरातील तमाम चाहते या ठिकाणी दाखल झाले आहेत. याच रग्बीचा वर्ल्डकप पाहण्यासाठी लंडनमधील  दाेन मित्रही जपानमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, त्यांनी लंडन ते रग्बीच्या विश्वचषक आयाेजित केलेल्या स्टेडियमचा पल्ला सायकलवरून गाठण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे त्यांचे जपानमधील विश्वचषक पाहण्यासाठी झालेले आगमन हे सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले आहे. हा विश्वचषक २ नाेव्हेंबरपर्यंत चालणार आहे.  

लंडनमधील जेम्स आणि राेन या दाेन्ही मित्रांना रग्बीची आवड आहे. त्यांनी जपानमध्ये आयाेजित विश्वचषक थेट स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचे ठरवले. तेही सायकलवरून. सुरुवातीला हा निर्णय अधिकच आव्हानात्मक वाटणारा हाेता.  त्यासाठी त्यांनी याची तयारी केली. त्यांनी थेट सायकलने हा  प्रवास करण्याचे ठरवले. यासाठी त्यांना २०  हजार ९३ िकमीचे अंतर सायकलवरून गाठावे लागले. त्यांनी २३० दिवसांपूर्वी या खडतर प्रवासाच्या माेहिमेला सुरुवात केली.  या माेहिमेदरम्यान जेम्स आणि राेन यांनी २७ देशांतून प्रवास केला. त्यांचे प्रत्येक देशात माेठ्या जल्लाेषात स्वागत  झाले. अनेकांनी आर्थिक मदतही केली. त्यामुळे जमा झालेले पैसे आता हे दाेघेही गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करणार आहेत.