आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वेळा 150 पेक्षा कमी स्काेअर; भारतीय संघाचा 14 वा पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : मुशफिकुर रहीमने (६०) नाबाद अर्धशतकाच्या बळावर बांगलादेश संघाला रविवारी सलामीच्या टी-२० सामन्यात भारताविरुद्ध राेमहर्षक विजय मिळवून दिला. कर्णधार महमुद्दुल्लाहच्या कुशल नेतृत्वात बांगलादेश संघाने टी-२० फाॅरमॅटच्या मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. बांगलादेशने रविवारी मालिकेतील सलामीच्या सामन्यात भारतावर मात केली. बांगलादेशने सात विकेटने सामना जिंकला. यासह बांगलादेशने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी रंगणार अाहे.


प्रदूषणाच्या सावटानंतरही झालेल्या बांगलादेशविरुद्ध सलामीच्या टी-२० सामन्यात यजमान भारतीय संघाची दमछाक झाली. भारताने २० षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात पाहुण्या बांगलादेशसमाेर १४९ धावांचे टार्गेट ठेवले. प्रत्युत्तरात बांगलादेशने १९.३ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले.
वाढत्या वायुप्रदूषणाच्या धाेक्यामुळे या सामन्याच्या अायाेजनाबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात हाेते. मात्र, या सामन्याच्या अायाेजनावर याच काेणताही परिणाम झाला नाही. हा अाेव्हरअाॅल १००० वा टी-२० सामना ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना टी-२०च्या फाॅरमॅटमध्ये २० व्यांदा १५० पेक्षा कमी धावांचा स्काेअर नाेंदवला अाहे.मात्र, यामुळे टीमला १४ व्यांदा अशा कमी स्काेअरवर पराभवाला सामाेरे जावे लागले अाहे.
सामन्यात १५ व्या षटकादरम्यान चाेरटी धाव घेताना शिखर धवन. मात्र, ताे यात धावबाद झाला. त्याच्या सर्वाधिक ४१ धावा.


शिवम भारताचा ८२ वा क्रिकेटपटू ठरला
१४ वर्षांत टी-२० चे १००० सामने झाले पूर्ण; वनडेने हा पल्ला गाठला २४ वर्षांनंतर
टी-२० : पहिला मॅच: १७ फेब्रु.२००५, ऑस्ट्रेलिया वि.न्यूझीलंड (ऑस्ट्रेलिया विजयी) 1000 वा सामना : ३ नाेव्हेंबर,२०१९ भारत विरुद्ध बांगलादेश (बांगलादेश विजयी)
वनडे : पहिला मॅच: ५ जाने.१९७१ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (ऑस्ट्रेलिया विजयी) 1000 वा सामना : २५ मे,१९९५ इंग्लंड विरुद्ध विंडीज, (विंडीज विजयी)
कसाेटी : पहिला मॅच: १५ मार्च,१८७७, ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड(ऑस्ट्रेलिया विजयी) 1000 वा सामना : २५ नाेव्हेंबर १९८४, न्यूझीलंड विरुद्ध पाक (पाकिस्तान विजयी)


शिवम दुबेला या सामन्यासाठी संधी मिळाली. ताे टी-२० खेळणारा भारताचा ८२ वा खेळाडू ठरला. राेहितचा हा ९९ वा सामना हाेता. ताे भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारा क्रिकेटपटू ठरला.

धावफलक नाणेफेक बांगलादेश (गाेलंदाजी)
भारत धावा चेंडू ४ ६
राेहित पायचीत गाे.शेफुल ०९ ०५ ०२ ०
शिखर धवन धावबाद ४१ ४२ ०३ १
राहुल झे. महमुद्दुलाह गाे. अमिनुल १५ १७ ०२ ०
श्रेयस झे. नईम गाे. अमिनुल २२ १३ ०१ २
ऋषभ झे.नईम गाे. शेफुल २७ २६ ०३ ०
शिवम दुबे झे. गाे. अफिफ ०१ ०४ ०० ०
क्रुणाल पांड्या नाबाद १५ ०८ ०१ १
वाॅशिंग्टन सुंदर नाबाद १४ ०५ ०० २
अवांतर : ०४. एकूण : २० षटकांत ६ बाद १४८ धावा. गडी बाद हाेण्याचा क्रम : १-१०, २-३६, ३-७०, ४-९५, ५-१०२, ६-१२०. गाेलंदाजी : शेफुल ४-०-३६-२, अमिन ४-०-२७-०, मुस्तफिजूर २-०-१५-०, अमिनुल ३-०-२२-२, साैम्य २-०-१६-०, अफिफ ३-०-११-१, माेसादेक हुसैन १-०-८-०, महमुद्दुल्लाह १-०-८-०.
बांगलादेश धावा चेंडू ४ ६
लिटन दास झे. राहुल गाे. चाहर ०७ ०४ ०१ ०
माे.नईम झे. धवन गाे. यजुवेंद्र २६ २८ ०२ १
साैम्य सरकार त्रि.गाे. अहमद ३९ ३५ ०१ २
मुस्तफिकुर रहिम नाबाद ६० ४३ ०८ १
महमुद्दुल्लाह नाबाद १५ ०७ ०१ १


अवांतर : ०७. एकूण : १९.३ षटकांत ३ बाद १५४ धावा. गडी बाद क्रम : १-८, २-५४, ३-११४ गाेलंदाजी : चाहर ३-०-२४-१, संुदर ४-०-२५-०, अहमद ४-०-२५-१, यजुवेंद्र चहल ४-०-२४-१, क्रुणाल पांड्या ४-०-३२-०, शिवम ०.३-०-९-०.