आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात एकटीच होती तरुण मुलगी, अचानक बापाने केले असे काही; पत्नीने जाब विचारताच समोर आली 'ही' शॉकिंग हकिगत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - चारित्र्यावरील संशयामुळे मंगळवारी दुपारी एका व्यक्तीने आपल्या 20 वर्षीय मुलीची उपरण्याने गळा आवळून हत्या केली. मृतदेह ड्रममध्ये लपवला. पत्नी जेव्हा घरी आली तेव्हा तिच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. पत्नीने कुऱ्हाड हिसकावून घेतान पतीने विष प्राशन केले. दुसऱ्या दिवशी जेव्हा आरोपीला शुद्ध आली तेव्हा पत्नीने मुलीबाबत विचारले असता त्याने हत्या केल्याचे सांगितले.

 

'त्या' दिवशी कामानिमित्त लवकर घरी आली होती मुलगी...
परदेशीपुरा पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उपचारांनंतर त्याला अटक केली जाणार आहे. पोलिस अधिकारी मिश्रा म्हणाले, 48 वर्षीय आरोपी बबलेश अहिरवारची पत्नी सुदामाने जबाब दिला आहे की, त्यांचे 3 सदस्यांचे कुटुंब आहे. सर्व मजुरी करून पोट भरतात. मुलगी राणी एका प्ले स्कूलमध्ये मुलांना सांभाळण्याचे काम करत होती. घटनेच्या दिवशी सर्वजण कामावर गेले होते. मुलगी दुपारी लवकर घरी परतली होती. पती घरातच होता. ती फोनवर बोलू लागली तेव्हा त्याने पाठीमागून तिचा उपरण्याने गळा आवळला आणि मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवून दिला. त्यावर तिचे कपडे व अंथरुण ठेवून दिले.

 

तो तडफडू लागला तेव्हा रुग्णालयात नेले...
मी घरी आल्यावर तो रागातच होता. त्याने वाद घालत कुऱ्हाडीने हल्ला चढवला. मी कुऱ्हाड हिसकावली तेव्हा 16 वर्षांचा मुलगा लंकेश धावून आला. यादरम्यान पतीने विष प्राशन केले, त्याने ते आधीच ग्लासमध्ये काढून ठेवलेले होते. काही विषारी गोळ्यासुद्धा खाल्ल्या. परंतु तो जेव्हा तडफडू लागला तेव्हा आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो.

 

पत्नीवरही घ्यायचा संशय
आरोपी बबलेश हा त्याच्या मुलीसोबतच पत्नीवर संशय घ्यायचा. मुलगी फोनवर बोलायची तेव्हा तो नाराज व्हायचा. काल ती जरा लवकरच घरी आली होती. तिला फोनवर बोलताना पाहून त्याने रागाच्या भरात हे कृत्य केले. 

 

बातम्या आणखी आहेत...