आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांना आवडली नाही या 20 वर्षीय मॉडेलची LifeStyle; शांत करण्यासाठी झाडल्या 3 गोळ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद - इराकची इंस्टाग्राम सेलिब्रिटी आणि मॉडेल तारा फारिस हिचा बगदादमध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला आहे. कार चालवताना हल्लेखोरांनी तिच्यावर 3 गोळ्या झाडल्या. इराकच्या गृहमंत्रालयाने मॉडेलच्या मृत्यूच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला आहे. अवघ्या 20 वर्षांची ही मॉडेल आपल्या टॅटू, डिझायनर कपडे आणि स्टायलिश हेअर कलर्सवरून लोकप्रीय होती. परंतु, हीच ओळख तिच्यासाठी जीवघेणी ठरली. तिच्या लाइफस्टाइलवर चिडलेल्या कट्टरपंथियांनी तिचा खून केला. इंस्टाग्रामवर तिचे 27 लाख फॉलोअर्स आता या घटनेसाठी देश आणि सरकारला जाब विचारत आहेत.


- ताराच्या हत्येनंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला. इतक्या कमी वयातच मिळालेल्या प्रसिद्धीने तिचा जीव घेतला असे सांगितले जात आहे. ताराच्या मृत्यूवर कार्टूनिस्ट अहमद-ए-बशीर यांनी शोक व्यक्त करताना लिहिले, "एका तरुणीला फक्त या कारणामुळे ठार मारण्यात आले की ती इराकच्या दुसऱ्या तरुणींप्रमाणे का जगत नाही."
- इराक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. परंतु, अद्याप घटनेतील आरोपींचा शोध लागलेला नाही. घटनास्थळाचा सीसीटीव्ही आणि स्थानिकांची चौकशी करून सविस्तर तपास केला जात आहे. 
- ताराचे इंस्टाग्रामवर 27 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नुकतेच तिला इराकमध्ये सोशल मीडियावर सर्वात लोकप्रीय सेलिब्रिटी असा मान मिळाला होता. 1998 मध्ये जन्मलेली तारा हिचे वडील इराकी आणि आई लेबनानची रहिवासी होती. 2015 मध्ये तिने सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.

 

बातम्या आणखी आहेत...