आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यवंशमचे 20 वर्ष : 1999 मध्ये रिलीज झाली होता चित्रपट, त्याच वर्षी लॉन्च झाले चॅनल, यामुळे अजून 80 वर्ष टेलीकास्ट होणार 'सूर्यवंशम'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - अमिताभ बच्चनचा सूर्यवंशम चित्रपट वीस वर्षांपूर्वी 21 मे रोजी प्रदर्शित झाला होता. फक्त  7 कोटी रूपयांचे बजट असलेल्या चित्रपटाने 12.65 कोटी रूपयांचा व्यवसाय केला होता. पण विशेष म्हणजे सूर्यवंशम अजून 80 वर्षे टीव्ही पाहावी लागणार आहे. कारण सोनी मॅक्स वाहिनीने चित्रपटाचे 100 वर्षांचे राइट्स खरेदी केले होते. आता तर फक्त 20 वर्ष सरले आहेत. अजून 80 वर्ष हा चित्रपटा सोनी मॅक्स चॅनलवर दाखविण्यात येणार आहे. 

 

चित्रपटासंबंधी काही विशेष गोष्टी


एकाच वर्षी आले चित्रपट आणि चॅनल
> सूर्यवंशम 21 मे 1999 रोजी रिलीज झाली होती. त्याच वर्षी सोनी मॅक्स चॅनल लॉन्च करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी सोनी मॅक्सचे मार्केटिंग हेड वैशाली शर्माने सांगितले की, चॅनलने या चित्रपटाचे 100 वर्षांचे राइट्स खरेदी केले आहेत. यामुळे हा चित्रपट सोनी मॅक्स चॅनलवर नेहमी दाखवला जातो. 

 

या कथेवर 4 भाषांमध्ये झाला सूर्यवंशम
> 1997 ते 2000 पर्यंत सूर्यवंशमच्या स्टोरीवर चार चित्रपट बनवण्यात आले. पहिला चित्रपट 1997 मध्ये तमिळमध्ये आला होता. यामध्ये सरथ कुमार आणि देवयानी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर 1998 मध्ये तेलुगुत दग्गुबाती व्यंकटेश आणि मीना दुरईराज यांच्यासोबत हा चित्रपट तयार करण्यात आला. तिसऱ्यावेळेस अमिताभचा 1999 मध्ये हिंदी सूर्यवंशम टायटलने तयार करण्यात आला. तर 2000 मध्ये चौथ्यावेळेस कन्नड भाषेत सूर्यवम्शा या टायटलने चित्रपट करण्यात आला. यामध्ये विष्णुवर्धन आणि ईशा कोपीकर मुख्य भूमिकेत होते. 

 

बंगालमध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता चित्रपट
> चित्रपटाचे दिग्दर्शन ईवीी सत्यनारायण यांनी केले होते. चित्रपटात सौंदर्या आणि जयासुधा यांच्या आवाजाची डबिंग रेखाने केली होती. 1997 मध्ये आलेला तमिळ चित्रपट सूर्यवमसम या चित्रपटाचा हा रिमेक होता. सूर्यवंशमचे चित्रीकरण गुजरात, हैदराबाद आणि पोलोन्नारुवा, कॅन्डी श्रीलंका येथे झाले होते. बंगालमध्ये हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. कोलकाताच्या मेट्रो सिनेमामध्ये या चित्रपटाने 100 दिवस पूर्ण केले होते. 

 

मुख्य अभिनेत्रीचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला
> चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारी सौंदर्या रघु आता या जगात नाहीये. 17 एप्रिल 2004 रोजी बंगळुरूजवळ एका विमान अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला. सौंदर्याने 1992 मध्ये 'गंधरवा' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मळयालम असे सर्व भाषा मिळून 100 हून अधिक चित्रपटांत काम केले. सौंदर्याला 6 साउथ फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले आहेत. साउथ चित्रपटांत आपली छाप सोडणाऱ्या सौंदर्याचा 'सूर्यवंशम' हा पहिला आणि शेवटचा बॉलीवूड चित्रपट होता. 

बातम्या आणखी आहेत...