Maharashtra Crime / जवळ्यात 20 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, व्हॉटस्अ‍ॅपवर 'मिस यू भावांनो, भेटू परत' असे स्टेटस ठेवून घेतला गळफास

आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी  मित्रांसाठी असे स्टेटस ठेवले

दिव्य मराठी वेब

Jul 29,2019 05:26:00 PM IST

जामखेड- तालुक्यातील जवळा येथे एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही तरी, त्याने मृत्यूपूर्वी व्हॉटस्अ‍ॅपवर "मिस यू भावांनो, भेटू परत" असे स्टेटस ठेवले होते.


जवळा गावातील जवळा-करमाळा रस्त्याजवळ खंडोबा मंदिर परिसरामध्ये असलेला शेतामधील झाडाला अशोक संजय मते(वय 20)चा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आला. ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषि केले. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबाच्या ताब्यात केला.


दरम्यान अशोकने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाहीये. मयत अशोक यास कबड्डी खेळण्याची आवड होती. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी व्हॉटसअ‍ॅपवर मित्रांसाठी "मिस यू भावांनो, भेटू परत" असे स्टेटस ठेवले होते. जवळा गावामध्ये या घटनेने मोठी शोककळा पसरली आहे. त्याच्या मित्रासह नातेवाईकांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.

X
COMMENT