आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०० खाटांचे महिला रुग्णालय दोन वर्षांत उभे राहणार : पालकमंत्री दीपक सावंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पाच वर्षांपासून चर्चेत असलेले २०० खाटांचे महिला रुग्णालय पुढील दोन वर्षांत आकारास येणार असून शासकीय दूध डेअरीच्या जागेवर ६.२ एकरात हे रुग्णालय उभारणीला न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानेही रुग्णालय उभारणीला वेग दिला आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री दीपक सावंत यांनी दोन वर्षांत महिला रुग्णालय उभे करा, असे आदेश त्यांनी दिले. 


बृहत आराखड्यात मंजूर या रुग्णालयासाठी ५ वर्षांपासून जागेचा शोध सुरु होता. आता शहराच्या मध्यवर्ती भागात जागा मिळाली आहे. डॉ. सावंत यांनी जागेची पाहणी केली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांना जलदगतीने पाऊले उचलण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयासाठी गेल्याच महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिली. साक्षांकित प्रत मिळाल्यानंतर जागेचा सातबारा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावावर होईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...