आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक टप्प्यात २.५ लाख सीआरपीएफ जवानांना नेण्यासाठी २५ हेलिकॉप्टर, ५०० रेल्वे लागणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत सर्वात मोठी निवडणूक उत्सव सुरू आहे. तो यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठे पोलिस दलही तैनात आहे.  ११ एप्रिल ते १९ मेपर्यंत ७ टप्प्यांत निवडणूक आहे. प्रत्येक टप्प्यात मतदान करण्यासाठी २.५ लाख सीआरपीएफचे जवान एका ठिकाणाहून दुसरीकडे जात आहेत. त्यांना केंद्रापर्यंत नेण्यासाठी २५ हेलिकॉप्टर, ५०० रेल्वे, १७५०० बस, शेकडोंच्या संख्येने घोडे, नाव, जहाजाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी २०० कोटी रुपये लागतील. निवडणुकीत गृह मंत्रालय, निवडणूक आयोग, निमलष्करी दले या तीन विभागांची महत्त्वाची भूमिका आहे.

 

देशातील सर्वात दुर्गम केंद्रे, २४ मतदारांपर्यंत पोहोचण्यास ४ दिवस लागले

लोकसभा निवडणूक भारतीय लोकशाहीचा सण आहे. त्यात भारतीय मतदारांना सहभागी करण्यासाठी निवडणूक ड्यूटीसाठी तैनात कर्मचारी आणि जवान कुठे जातात ते पाहूया...

 

> लुइट खबालू : आसाम. तेथे पोहोचण्यासाठी कर्मचारी सुबानसिरी नदी ओलांडतात

> पिलोपाटिया: अंदमान-निकोबार, पोर्ट ब्लेअर हून येथे येण्यास २४ तास लागतात. 

> छेप्पे:(2204 मी.), दिबांग खोरे, अरुणाचल २४ मतदारांपर्यंत जाण्यास ४ दिवस ७ तास लागतात.

> बडा बंघाल:(2400 मी), कांगडा, हिमाचल, 1457 मी. उंचीवर, हेलिकॉप्टरने जावे लागते.

> अबुजमाड: छत्तीसगड. हे केंद्र ४ किमी जंगलात नक्षलवाद्यांच्या भागात आहे.

> शुन चुमिक गिलसा: (4240 मी.) कारगिल,हे  3657 मीटर उंचीवरील मतदान केंद्र आहे.

बातम्या आणखी आहेत...