आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वृक्ष वाचवा' संदेश घेऊन 200 परदेशी पर्यटकांचा 83 रिक्षांनी भारतात प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नितीश गोवंडे | औरंगाबाद वृक्ष,जंगल संपत्तीचा नाश वाचवून पर्यावरण बचावचा संदेश देत जगभरातील २०० परदेशी पर्यटक ८३ रिक्षांनी कोची (केरळ) ते जैसलमेर (राजस्थान ) प्रवासाला निघाले आहेत.संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. यामुळे भविष्यात मोठे संकट निर्माण होऊ शकते. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर मनुष्याचा ऱ्हासदेखील निश्चित आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी 'कुलअर्थ' या सामाजिक संघटनेतर्फे जगभरातील विविध पर्यावरण संवर्धन संघटनांनी एकत्र येत 'द अॅडव्हॅनचर टुरिस्ट्स रिक्षा रन-ऑगस्ट २०१९' चे आयोजन केले आहे. यासाठी जगभरातून सुमारे २०० विदेशी पर्यटक भारतात आले असून कोची ते जैसलमेर (राजथान) हा प्रवास रिक्षाने करत आहेत. जर्मनी, स्कॉटलंड, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका या देशातील सुमारे २०० नागरिक सोमवारी औरंगाबादेत आले होते. त्यांनी १० ऑगस्ट रोजी केरळच्या कोची शहरातून ८३ रिक्षा भाड्याने घेऊन 'सेव्ह रेनफॉरेस्ट - सेव्ह अर्थ सेव्ह ट्री' या उपक्रमाला सुरुवात केली. 

भेटीत सामाजिक संदेश 
या प्रवासादरम्यान हे २०० नागरिक ज्या राज्यांना, शहरांना, विविध पर्यटन स्थळांना भेट देत आहेत, त्या ठिकाणी रेन फॉरेस्ट, वृक्ष किती महत्त्वाचे आहे, वृक्षतोडीमुळे पृथ्वीची किती हानी झालेली आहे आणि भविष्यात झाडे कशी वाचवावीत, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. 

रिक्षा चालवण्यासह सामाजिक कार्य 
आम्ही कोचीपासून जैसलमेरपर्यंत रिक्षा चालवत कुलअर्थद्वारे सेव्ह रेनफॉरेस्ट, सेव्ह अर्थ हा सामाजिक संदेश देत आहोत. यामुळे संपूर्ण देशाचा दौरा होतो आणि आपण एका सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकलो याचा आनंदही मिळतो. - मॅट बॉश आणि रॅआना बॉश,अमेरिका 

रिक्षांना दिले वेगळे रंग 
केरळ येथूनच ८३ रिक्षा घेऊन त्यांना विविध रंग देण्यात अाले. या रिक्षांवर वृक्षांसंबंधी विविध सामाजिक संदेश लिहिण्यात अाले आहेत. जगभरात अशा प्रकारे विविध नागरिक हा उपक्रम राबवत आहेत. पुढील वर्षीदेखील पुन्हा या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.