आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीच्या ५७ किमी गुळगुळीत महामार्गासाठी वैजापूरच्या २०० किमी ग्रामीण रस्त्यांची चाळणी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशांत त्रिभुवन 

वैजापूर - तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी शीघ्रसंचार महामार्गाच्या ५७ किलोमीटर अंतराच्या कामासाठी बेसुमार प्रमाणात गौणखनिजासह बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या १०० अवजड वाहनांच्या दिवस-रात्र होणाऱ्या २०० फेऱ्यांमुळे प्रमुख वाहतूक रस्त्यासह खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा भुगा पडला आहे. दरम्यान, रस्ते दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२० पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी शिल्लक नसल्याने दुरवस्था झालेल्या रस्त्यावर नागरिकांना जीवघेण्या यातना सोसण्याची पाळी आली आहे. समृद्धी महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांनी लक्ष केंद्रित केले. पावसामुळे दोन महिन्यांपासून बंद पडलेले काम पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी या रस्त्याची बांधणी करणाऱ्या एल अॅण्ड टी कंपनीने शंभरपेक्षा अधिक अवजड वाहनांचा ताफा विविध भागांतून गौणखनिज व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी रस्त्यावर उतरवले आहेत. परिवहन विभागाचे नियम पायदळी तुडवून या अवजड वाहनांमुळे रस्त्याची वाट लागली. रस्त्याचा पडला भुगा...

सार्वजनिक बांधकाम उपविभागाने प्रमुख रस्त्यावरून ४० ते ५० टन गौणखनिजाची अवजड वाहनातून कित्येक महिन्यांपासून वाहतूक होत असल्याने या रस्त्याची क्षमता आधिक प्रमाणात अधिभार पेलण्याची नसल्याने हजारो कोटींचा निधी खर्च झालेल्या रस्त्याचा भुगा झाल्याचे लेखी पत्र प्रादेशिक परिवहन विभागाला देऊन अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. ग्रामीण रस्त्याची झाली दैना... 

तालुका प्रशासनाने ग्रामीण भागातून समृद्धीच्या कामासाठी गौणखनिज उपसा करण्याचा परवाना दिला, मात्र या भागातून वाहतूक करताना प्रशासकीय नियमाची पायंमल्ली   होत असल्याने  बिलोणी, जरूळ या रस्त्यांची दैना झाली आहे. अनेकांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने आता दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न जरूळ माजी उपसरपंच प्रकाश मतसागर यांनी उपस्थित केला. दुरुस्तीसाठी मार्चपर्यंत प्रतीक्षा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या ३१ मार्च २०२० पर्यंत अर्थसंकल्पात मंजूर, तसेच कार्यारंभ आदेश न दिलेली कामे स्थगित करण्याचे आदेश दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी नवीन आर्थिक वर्षातील तरतुदीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे उपअभियंता बी. एन. चव्हाण यांनी दिली. वीरगाव-म्हस्की : आठ किलेमीटर

नागपूर-मुंबई हायवे रस्त्यावरून वीरगाव-म्हस्की मार्ग रस्ता आहे. या ठिकाणी दिवसरात्र वाहनाची तसेच बांधकाम साहित्याच्या वाहतुकीची वर्दळीमुळे वीरगाव रस्त्याची चाळणी झाली.

काय म्हणतात जबाबदार :  तातडीने रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा उपसभापती प्रभाकर बारसेंनी दिला. वैजापूर-उक्कडगाव :  ८ किम

अनेक वर्षांपासून वैजापूर हद्दीतील आठ किमीच्या रस्त्याची दुरुवस्ता झाली. उक्कडगाव रस्ता खराब झाल्याचे नगरसेवक शैलेश चव्हाण म्हणाले.नागपूर-मुंबई हायवे : ४० किमी

लासूरगाव ते सुराळा फाटा ४० किमीचा रस्ता देखभाल दुरुस्ती न केल्याने मुत्यूचा सापळा बनला.

काय म्हणतात जबाबदार :  तक्रार वैजापूर ठाण्यात देऊनही दुरुस्तीसाठी उपाययोजना होत नसल्याची खंत करंजगावचे ग्रामस्थ गोकुळ सुराशंेंनी व्यक्त केली. ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.

हे ग्रामीण मार्ग झाले बाधित 

जरूळ फाटा ते बिलाेणी : अंतर १२ किमी

अवजड वाहनांमुळे रस्ता पूर्णपणे खचला असून रस्त्यावर डांबरही उरले नाही. खड्डे वाढल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ हाेत आहे.

काय म्हणतात जबाबदार : बिलोणी, जरूळ रस्त्याची दुरुवस्था झाली.  बेसुमार वाहतुकीने रस्ता खचून गेला. तक्रारही केल्या. दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न   प्रकाश मतसागर यांनी केला आहे.लाडगाव चाैफुली ते लाडगाव, सावखेड गंगा : अंतर २० किमी

शहरापासून ते लाडगाव, सावखेड गंगा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.  शासनाच्या तिजाेरीत खडखडाट असल्याने कामाला पुढील दिवाळीनंतर आता मुहूर्त लागेल.

काय म्हणतात जबाबदार :  रस्ता दुरुस्ती हाेणे गरजेचे  असल्याचे मत माजी सभापती  बाबासाहेब पाटील जगताप मांडले.

बातम्या आणखी आहेत...