आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 200 People Travelled 538 Km In 31 Days For The Dissemination Of Buddha Thoughts, Third Year Of Walking, Including 100 Children

बुद्ध विचारांच्या प्रसारासाठी 200 भिक्खूंचा 31 दिवसांत 538 किमी पायी प्रवास, पदयात्रेचे तिसरे वर्ष, 100 चिमुकल्यांचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरेगाव भीमा : तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अाणि मानवता, जागतिक शांतता, एकता, अखंडतेचा संदेश सर्वदूर पाेहाेचवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांचा भिक्खू संघ अकोला ते कोरेगाव भीमा हे ५३८ किलोमीटरचे अंतर ३१ दिवसांत पायी चालत कोरेगाव भीमा येथे दाखल झाला. धम्मयात्रा पदयात्रेचे हे तिसरे वर्ष असून यात १०० चिमुकल्यांसह २०० भिक्खूंचा सहभाग अाहे.

चिमूर तालुक्यातल्या बोथली येथील संघारामगिरी सर्व भिक्खू संघ तपोवन बुद्धविहाराचे भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या संकल्पनेतून ही धम्मयात्रा सुरू आहे. ज्ञानज्योती महास्थवीर यांच्यासाेबत पू. भदंत दिव्यनाग थेरो, पू. भंते धम्मचेनी, पू. भंते सूर्यज्योती, पू. भंते अग्नज्योती यांच्यासह १० वर्षांखालील १०० भिक्खू सहभागी आहेत. १ डिसेंबर रोजी पदयात्रा अकोल्यातून निघाली, ३१ डिसेंबर रोजी कोरेगावात पोहोचली. सामाजिक क्रांती अभियानांतर्गत हा प्रवास केल्याचे ज्ञानज्योती महास्थवीर यांनी सांगितले. मार्गावरील सर्व गावांत या धम्मयात्रेचे जाेशात, ढोल -ताशांच्या गजरात स्वागत झाले. ग्रामस्थांकडून भोजनाची सोय केली जात हाेती. त्याच ठिकाणी धम्मदेसना, सूत्रपठण आणि अखेरीस ध्यान केले जायचे. दुसऱ्या दिवशी पहाटे यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ व्हायची. गाव जवळ येताच चिमुकले लांबसडक धम्मध्वजाने रस्त्याचा एक भाग व्यापून टाकायचे. त्यांच्या वाहनावरील विजयस्तंभाची प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती. अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, पुणे असा यात्रेचा प्रवास हाेता.

सामाजिक ऐक्याचा संदेश

'पेशव्यांचे खरे पानिपत कोरेगाव भीमा येथे झाले. महारांच्या गळ्यातील घाडगे आणि झाडू दूर झाला. पण ब्राह्मणवाद संपला नाही. ताे फक्त ब्राह्मण जातीपुरता सीमित नसून तो प्रत्येक घरात, समाजात पसरलेला आहे. याची पहिली लढाई १८१९ मध्ये काेरेगावात जिंकली. ती पुढे नेण्यासाठी ब्राह्मणेतर समाजाचे एकत्रीकरण आवश्यक आहे. कोरेगावात वाढत चाललेली गर्दी त्याचेच प्रतीक अाहे. मन तोडणारे नव्हे, तर जोडणारे लोक हवेत. जगाला युद्ध नव्हे, बुद्ध हवा,' असे भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.