आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 200 Years Old Tradition Of Friendly War; People Celebrate By Throwing Eggs, Flour And Herbal Colours At Each Other

मैत्रीपूर्ण युद्धाची 200 वर्षे जुनी परंपरा; लोक एकमेकांवर अंडी, पीठ आणि हर्बल रंग फेकून साजरा करतात उत्सव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद : स्पेनचे 200 वर्षे जुने कॅथोलिक फूड फाइट फेस्टिव्हल एलकांटेच्या आयबीआय शहरामध्ये आहे. यादरम्यान लोकांनी एकमेकांवर सडलेली अंडी, पीठ, हर्बल रंग आणि फटाक्यांची राख फेकून फेस्टिव्हल सेलिब्रेट केले. प्रत्येक 28 डिसेंबरला साजरा केला जाणारा सॅन प्रेम आणि मैत्रीपूर्ण छोट्या युद्धाचे प्रतीक आहे. हे सेलिब्रेशन सकाळी 8  झाले आणि सुमारे दोन वाजेपर्यंत चालले. यासाठी दोन टीम बनवल्या गेल्या होत्या. महिलादेखील सामील झाल्या. 


दोन्ही टीमने वेगवेगळ्या रंगांचे सेनेसारखे युनिफॉर्म घातले आहे. सोहळ्याची सुरुवात मेयरने केली. यानंतर सर्वांनी एकमेकांवर सडलेली अंडी, पीठ, हर्बल रंग फेकायला सुरुवात केली. फेस्टिव्हलमध्ये 22 हजारांपेक्षा जास्त अंडी आणि सुमारे 13 टन पीठ फेकले. 

जापान, दक्षिण कोरियाचे पर्यटकदेखील पोहोचले... 


फेस्टिव्हलमध्ये प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे, जी व्यक्ती यामध्ये सामील होत सोहळ्याचे नियम मोडते, प्रशासन त्यांच्याकडून दंड वसूल करते. दंडातून जमा झालेली रक्कम चॅरिटीमध्ये दिली जाते. उत्सवात जापान, दक्षिण कोरिया, ब्रिटनसह 12 देशांचे पर्यटक सामील झाले.