आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णवाहिकेला रुग्णालयात तातडीने पोहोचण्यासाठी २ हजार बाइकर्सची मदत, ८० शहरांत मोफत सेवा, सर्वांची स्वत:ची मोटारसायकल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - आणीबाणीच्या परिस्थितीत वाहतुकीतून मार्ग काढून रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्याचे आव्हान सुकर करण्यासाठी इंडोनेशियातील आम्ही तरुणांनी बाइकर्स ग्रुपने या नावाने  मोहीम हाती घेतली आहे. इंडाेनेशियन एस्कॉर्टिंग अॅम्ब्युलन्स (आयइए) या ग्रुपने देशातील ८० शहरांत ही सेवा आम्ही अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेच्या बाजूने ग्रुपचे प्रत्येकी दोन बाइकर्स सोबत जातात. समोर व मागील बाजूने प्रत्येकी दोन बाइकर्स वाहतुकीला हटवून रुग्णवाहिकेचा मार्ग प्रशस्त करतात. रुग्णवाहिकेच्या चालकाला कमी वाहतुकीचा आणि सोयीच्या रस्त्याबद्दलची माहितीही पुरवतात. 


२०१७ मध्ये सुरुवात : इंडोनेशियातील शहरातील रस्ते गर्दीने फुललेले असतात. रुग्णवाहिकेला मार्ग करून द्यावा याबाबतची जागरुकता येथील नागरिकांमध्येे नसल्यामुळे वाहतुकीचा रुग्णवाहिकांना अडसर ठरतो. ही मोठी समस्या आहे. त्यामुळे अनेक रुग्णांवर वेळेत उपचार होऊ शकत नाहीत. या मोहिमेमुळे अॅम्ब्युलन्स पोहोचण्याचा कालावधी ३०-४० टक्क्यांनी कमी झाला आहे. 


अलर्ट मिळताच पोहोचतात : देशभरात सर्व प्रमुख रुग्णालयांत आमच्या ग्रुपच्या सदस्यांचे क्रमांक आहेत. अॅम्ब्युलन्स चालकाला माहिती मिळताच आम्हाला ठिकाण, मार्ग व रुग्णाची स्थिती सांगितली जाते. त्यानंतर तीन ते चार बाइकर्स तेथे पोहोचतात. 

 

भूकंप, पूर, आगीशिवाय शोध, बचाव मोहिमेतही बाइकर्स धावून आले

> या ग्रुपचे सदस्य अॅम्ब्युलन्सला पोहोचवण्याशिवाय भूकंप, पुरासारखी आपत्ती, आग, पाेलिसांना तपासात मदत, बचाव मोहिमेतही योगदान देतात. 
> मोहिमेचा खर्च कार्यकर्ते उचलतात. संस्थापकासह अनेक सदस्यांकडे अद्याप रोजगार नाही.

 

संशोधन : ४० किमी पूर्ण करण्यासाठी दोन तासांहून जास्त वेळ लागतो 
{फॉर्च्युनच्या मते, इंडोनेशियात जगातील सर्वात जास्त वाहतूक आहे. या बाबतीत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात ४० किमी जाण्यासाठी किमान दोन तासांचा वेळ लागतो. वर्षभरात कार चालकास वाहतुकीमुळे ३३ हजार वेळा गाडी चालू-बंद करावी लागते. 
 

बातम्या आणखी आहेत...