आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: खोदताना अचानक सापडली 2000 वर्षे जुनी ममी, पण 'या' गोष्टीमुळे शास्त्रज्ञांनाही फुटला घाम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - 2100 वर्षांहून जास्त काळापासून प्रिझर्व्ह करून ठेवलेली एका चिनी महिलेची ममी वैज्ञानिकांसाठी कोडे ठरली आहे. खोदकामत अचानक आढळलेल्या या महिलेला लेडी ऑफ दई नावाने ओळखले जाते. तिला जगातील सर्वात चांगली प्रिझर्व्ह करून ठेवलेली ममी मानले जाते. तिची स्किन एकदम सॉफ्ट आहे आणि हाथ-पाय वाकत आहेत. तिच्या शरीरातील अवयवांपासून ते डोळ्यांच्या पापण्या आणि केसं व्यवस्थित आहेत. दुसरीकडे, शरीरात रक्ताचे अंशही आढळले आहेत. यावरून या महिलेच्या ब्लड ग्रूपचा शोध लावण्यात आला.

 

हार्टअटॅकचे सर्वात जुने प्रकरण
- लेडी ऑफ दई हिला शिन झुई या नावानेही ओळखले जाते. ती हान डायनेस्टी (206 ई.पू. से 220 ईसवी) दरम्यान होती. ती मर्कुइस ऑफ दईची पत्नी होती.  
- शिन झुईचा मकबरा हुनान प्रांतातील चांगशामध्ये एक हिल टाउन मवांगदुईत 1971 मध्ये आढळला. जेव्हा वर्कर हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी शेल्टर तयार करण्याकरिता खोदकाम करत होते.
- शिनच्या अटॉप्सीमध्ये समोर आले आहे की, तिचे वजन खूप जास्त होते. यासोबतच तिला बॅक पेन, हाय ब्लडप्रेशर, लिव्हरचा आजार, स्टोन्स, डायबिटीज आणि हार्टसंबंधित आजार होते.
- अटॉप्सीनुसार, 50 वर्षे वयात शिनचा हार्टअटॅकमुळे मृत्यू झाला होता. वैज्ञानिकांचे मानणे आहे की, ती हार्टच्या आजारांचे सर्वात जुने प्रकरण ठरली आहे.
- एक्सपर्ट्स मानतात की, यामागचे कारण म्हणजे तिची लॅव्हिश लाइफस्टाइल होती. एक्पर्ट्सनी या लग्जरी लाइफस्टाइलमुळे तिला 'दीवा ममी' असेही नाव दिले आहे.

 

100 हून जास्त सिल्कचे कपडे
ज्या मकबऱ्यातून शिनची ममी 12 मीटर खोल खड्ड्यात दबलेली आढळली होती, तेथील वॉर्डरोबमध्ये तिचे सिल्कचे 100 हून जास्त कपडे, 182 पीस महागडे लाखेची भांडी, मेकअपचे सामान आणि साबण, शाम्पू, टूथपेस्ट यासारख्या वस्तू आढळल्या होत्या. तिच्या कबरीत नोकरांचा पुरावा देणाऱ्या 162 नक्षीदार लाकडी मूर्तीही होत्या.


20 लेयर सिल्कमध्ये लपेटलेली होती बॉडी
- रिकॉर्ड्सनुसार, शिन झुईची बॉडी 20 लेअर सिल्कमध्ये लपेटून चार ऑफिनमध्ये ठेवण्यात आली होती. ती पॅक करण्यासाठी 5 टन चारकोल आणि चिकन मातीचा वापर करण्यात आला होता.
- तिच्या मकबऱ्याला वॉटरप्रूफ आणि एअरटाइट बनवण्यात आले होते. जेणेकरून त्यात कोणताही बॅक्टेरिया दाखल होऊ नये. आणि झालेही तसेच.
- यावरूनच शिनच्या ममीला अजूनही साइंटिस्टसाठी कोडे ठरली आहे. कारण बॉडी एवढी चांगल्या प्रकारे प्रिझर्व्ह करणे आजच्या काळातही महाकठीण काम आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचा Video व आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...