आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2003 Sajni Murder Case Husband Killed Wife On Valentine Day Arrested At Bangluru Airport

सजनी मर्डर केस 2003: 15 वर्षांपुर्वी व्हॅलेंटाइन-डेला प्रेमिकेसाठी पत्नीचा केला होता खून, पोलिसांना कन्फ्यूज करुन झाला होता गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद. 2003 मध्ये व्हॅलेंटाइन-डेला झालेल्या सजनी मर्डर केसचे रहस्य आता उलगडले आहे. क्राइम ब्रांचने या प्रकरणी सजनीचे पती तरुण धीन्नराजला बेंगलुरुमधून अटक केली आहे. तरुणचे एका आरजेसोबत प्रेमप्रकरण सुरु असल्यामुळे त्याने हत्या केल्याचे समोर आले. या दोघांना लग्न करायचे होते, पण पत्नी मधे येत होती.


जॉइंटर पोलिस कमिश्नर जेके भट्टने सांगितले की, बोपल परिसरातील हीरा-पन्ना फ्लॅटच्या तिस-या मजल्यावर 2003 मध्ये 14 फेब्रुवारीला बँक मॅनेजर महिलेची हत्या झाली होती. याप्रकरणी पती तरुण आपला जबाब वारंवार बदलत होता. कधी-कधी तो म्हणायचा की, सजनीची कुणीतरी हत्या केली, तर कधी म्हणायचा की, तिचा नैसर्गिक मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला विचारपुस केली, पण पुराव्या अभावी त्याला अटक करता आली नाही. पोलिस डॉगनेही तरुणवर भुंकून शंका व्यक्त केली होती. पण पोलिसांना याप्रकरणी पुरावा मिळाला नव्हता. घटनेनंतर तरुणला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे पोलिसांना चुकवून तो तिथून पळून गेला. पोलिसांनी त्याच्या सर्व मित्रांना विचारपुस केली, पण त्याचा शोध लागला नाही.

 

बेंगलुरुमध्ये असल्याच्या सुचना मिळाल्या 
पोलिसांनी तरुणला अरेस्ट करण्यासाठी अनेक राज्यामध्ये त्याचा तपास केला. पण त्याची काहीच माहिती मिळाली नाही. पोलिसांना नुकतीच माहिती मिळाली होती की, तरुण नाव बदलून बेंगलुरुमध्ये राहतोय. त्याने दूसरे लग्न केले आहे आणि त्याला दोन आपत्यही आहे. पोलिसांनी तरुणच्या एका नातेवाईकाचा फोन ट्रेस करण्याची व्यवस्था केली होती. याच फोनच्या आधारावर तो बेंगलुरुमध्ये असल्याचे कळाले. पोलिसांनी तरुणवर एक लाखांचे बक्षिसही ठेवले होते. अखेर पोलिसांनी 15 वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर पत्नीच्या हत्येचा आरोपी तरुणला अटक केली.

 

 

बातम्या आणखी आहेत...