आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलनात एक लाख काेटी किमतीच्या नाेटा जास्त कशा : विश्वास उटगी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नोटाबंदीनंतर ९९.३० टक्के रक्कम बँकेत परत आल्याचा दावा सरकार व रिझर्व्ह बँकेने केला होता. परंतु अारबीअायच्या २०१८ च्या वार्षिक अहवालामध्ये १ हजार व ५०० रुपयांच्या नाेटांतील तफावत पाहता सुमारे १ लाख २९ हजार ५० काेटी रुपयांच्या अतिरिक्त नाेटा चलनात असल्याचा दावा अारटीअाय अॅक्टिव्हिस्ट फाेरमने केला अाहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने नोटा वर्षभरानंतर चलनात आल्याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे फोरमचे विश्वस्त विश्वास उटगी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

 

मार्च २०१६मध्ये १ हजार रुपयांच्या ६ अब्ज ३२ कोटी ६० लाख इतक्या नोटा चलनात होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे मोठ्या प्रमाणावर नाेटा परत आल्या. त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेने मार्च २०१७ मधील अहवालात बाजारात एक हजार रुपयांच्या एकूण ८ कोटी ९० लाख इतक्या नोटा असल्याची माहिती देण्यात आली होती. परदेशात असलेल्या नागरिकांना मार्च २०१७ पर्यंत नोटा परत करण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने दिली हाेती. मात्र, त्यानंतर २०१८ मार्चमध्ये जाहीर झालेल्या आरबीआयच्या अहवालानुसार बाजारात एक हजार रुपयांच्या एकूण ६ कोटी ६० लाख नोटा चलनात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या नोटा गेल्या कुठे, याचे स्पष्टीकरण बँकेने द्यावी, अशी मागणी उटगी यांनी केली आहे. देशाचा साेन्याचा साठा अाणि मालमत्ता याच्या समतुल्य प्रमाणात नाेटा छापता येतात. मात्र, या अतिरिक्त छापलेल्या नाेटा चलनाच्या मुख्य प्रवाहात अाल्या अाहेत. या अतिरिक्त नाेटा बेहिशाेबी किंवा काळा पैसा असू शकतात. त्यामुळे यासंदर्भात संसदीय समितीने आरबीआय आणि सरकारला जाब विचारण्याची गरज फोरमने व्यक्त केली आहे. अन्यथा काेर्टात जाण्याचा इशारा दिला. 

 

काळा पैसा निर्माण झाल्याची भीती 
मुळात नोटा छापण्याचे आणि वितरणाचे काम आरबीआय करते. त्यामुळे या अतिरिक्त पैशांचा हिशेब देणे आरबीआयसाठी कायद्याने बंधनकारक आहे. नेपाळ, भूतानमध्ये भारतीय चलन चालते. नोटाबंदीनंतर या देशांसह पतपेढी, सहकारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या पैशामुळे या अतिरिक्त पैशांमधून काळा पैसा निर्माण झाल्याची शक्यता विश्वास उटगी यांनी व्यक्त केली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...