आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेरुन जेवढी स्टायलिश आतून तेवढीच लग्जरी आहे ही 7 सीटर कार, पुढच्या महिन्यात येणार नवीन मॉडल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क: भारतात स्वस्त कार सेल करणा-या डेटसन (Datsun) कंपनीने 2018 मॉडलची  Go आणि Go+ लॉन्च करण्याची तयारी केली आहे. अक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनी या दोन्ही कार लान्च करेल. अजून डेट फायनल केलेली नाही. कंपनीने हे दोन्ही नवीन मॉडल याचवर्षी इंडोनेशियामध्ये लाँच केले होते. 

DatsunGo 5 सीटर आणि Go+ 7 सीटर कार आहे.

 

भारतामध्ये उपलब्ध असणा-या मॉडलची किंमत 
- Datsun GO ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 3.38 लाख रुपये
- Datsun GO+ ची सुरुवात एक्स-शोरुम किंमत 3.95 लाख रुपये 

 

असे मिळू शकतात फीचर्स 
कंपनीने भारतात लाँच होणा-या या मॉडल्सच्या फीचर्सविषयी सध्या कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. असे बोलले जाते आहे की, इंडोनिशियामध्ये लाँच झालेल्या मॉडलप्रमाणे फिचर्स यामध्ये मिळतील. दोन्ही कारमध्ये हे कॉमन फिचर्स असू शकतात.


> ग्रिल, हेडलॅम्प आणि फ्रंट बंपर 
> LED डेटाइम रनिंग लॅम्प्स
> टर्न सिग्नल ORVM लाइट आणि LED टेललॅम्प्स
> अलॉय व्हील आणि इलेक्ट्रिक पावर स्टीयरिंग
> टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम


1.2 लीटरचे इंजिन
रिपोर्टनुसार, कंपनी दोन्ही कारच्या इंजिनमध्ये काहीच बदल करणार नाही. म्हणजे यामध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन मिळेल. हे 20 किलोमीटरचे मायलेज देते. मारुती स्विफ्ट, डिझायर, ब्रेजा, अर्टिगा सारख्या कारमध्येही एवढेच पावरफुल इंजिन आहे. डेटसनच्या दोन्ही मॉडलमध्ये 35 लीटरचे फ्यूल टँक आहे. कंपनीनुसार उपलब्थ मॉडलच्या सर्विससाठी प्रत्येक वर्षीसाठी फक्त 3 हजार रुपये खर्च करावे लागतात. 

 

रीमिक्स एडिशनचे ऑप्शन 
डेटसनने या दोन्ही कारचे रीमिक्स एडिशनही लॉन्च केले होते. यामध्ये रिमो की-लेस एंट्री, हँड्स फ्री ब्लूटूथ ऑडियो, स्टायलिश डुअल-टोन सीट कव्हर, ऑल ब्लॅक फ्रंट ग्रिल, स्टायलिश ब्लॅक व्हील कव्हर्स, पियानो ब्लॅक इंटीरियर, रियरमध्ये स्पोर्टी स्पॉइलर, स्टालिश क्रोम एक्सहॉस्ट फिनिशर आणि क्रोम बंपर बेजल दिले आहे. यासोबतच स्पीड सेंसिटिव्ह इलेक्ट्रिक पावर स्टीयरिंग, पावरफुल एयर कंडीशन, फ्रंट पावर विंडोज, USB चार्जिंग पोर्ट आणि सेंट्रल लॉकिंगसारख्या फिचर्सचा समावेश आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...