आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62KM चे मायलेज आणि 20 लीटरचा स्टोअरेज बॉक्स, फेस्टिव्ह सीजनमध्ये आली नवी स्कूटर; मजबूत आहे मेटल बॉडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - TVS ने आपल्या स्कूटर Wego चे नवे व्हेरियंट लाँच केले आहे. स्कूटरला युवापिढीला लक्षात घेऊन डिझाइन आणि ग्राफिक्स देण्यात आले आहेत. सोबतच, हे नव्या कलर्समध्येही उपलब्ध असेल. खास बाब म्हणजे कंपनीने यात 20 लिटरचा युटिलिटी बॉक्स दिलेला आहे. यासेाबत, यात बाय-पास स्विच आणि मेंटेनेंस फ्री बॅटरीही मिळेल.

 

कंपनीचे मार्केटिंग व्हाइस प्रेसिडेंट अनिरुद्ध हल्दर म्हणाले की, कंपनीने या स्कूटरमध्ये ग्राहकांच्या गरजेच्या हिशेबाने नवे फीचर्स जोडले आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की, याच्या वेगोचे नवे व्हर्जन ग्राहकांना पसंतीस उतरेल.

 

ही देशातील पहिली अशी स्कूटर असेल ज्यात बॉडी बॅलेंसिंग टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग दरम्यान राइडरला उत्तम बॅलेंस मिळेल. याला एर्गोनोमिक डिजाइन आणि आइडल इंजिन प्लेसमेंटसेाबत कंबाइन करण्यात आले आहे. स्कूटरमध्ये 110ccचे इंजिन आहे. कंपनीचा दावा आहे की, 62 kmplचे मायलेज देईल. याला रेड, ब्ल्यू, ग्रे आणि ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकतात.

 

स्कूटरचे इतर फीचर्स

> स्कूटरमध्ये अलॉय व्हील, ट्यूबलेस टायर
> फुल मेटल बॉडी
> कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम
> फुल डिजिटल स्पीडोमीटर
> LED टेल लॅम्प, गोल्डन आय इंडिकेटर्स  

 

बातम्या आणखी आहेत...