आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YEAR ENDER: 2018 मध्ये झुकरबर्गची झाली वाईट अवस्था, वॉरेन बफे यांच्यावर पडले मंदीचे सावट पण मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत झाली वाढ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझिनेस डेस्क- जगातील सर्वात श्रीमंत लोकांसाठी 2018 वाईट ठरला आहे. या वर्षात त्यांना 35841 अब्ज रूपये म्हणजेच 511 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. वर्षाचे पहिले सहा महिने त्यांच्यासाठी चांगले होते पण नंतर मंदी आल्यामुळे त्यांना खुप नुकसान उचलावे लागले आहे. पण भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी 2018 लकी ठरला आहे कारण त्यांना या वर्षात खुप लाभ झाला आहे आणि त्यांच्या संपत्तीत वाढदेखील झाली आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश सुची(Bloomberg Billionaires Index) नुसार जगातील 500 सर्वात श्रीमंत लोकांची संपत्ती शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत 4.7 ट्रिलियन डॉलर होती. एक ट्रिलियनमध्ये 1000 अब्ज असतात. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार जगभरात तणाव आणि ट्रेड वारमुळे अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता सांगितली गेली. त्यामुळे वर्षाच्या शेवटी बाजार कोसळला आहे.

2012 नंतर असे पहिल्यांदा झाले आहे की, या उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाली आहे. वर्षाच्या सुरूवातीला 5.6 ट्रिलियन डॉलर होती. नार्दन ट्रस्ट वेल्थ मॅनेजमेंटचे चीफ इनवेस्टमेंट ऑफिसर केटी निक्सनने सांगितले की, सुरूवातील गुंतवणुकदार वाढ होण्याची अपेक्षा होती. आम्ही मंदीची अपेक्षा नव्हती केली पण जागतीक लेव्हल वर मंदी येईल असा आम्हाला संशय होता.


कोणासाठी 2018 वाईट ठरला?
2018 फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्गसाठी हे वर्ष सगळ्या वाईट ठरले आहे. हे वर्षा त्यांच्यासाठी यामुळे वाईट ठरले कारण डेटा लीकसोबतच इतर अनेक प्रकरणात त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. मार्क झुकरबर्गची संपत्ति 2018 मध्ये 23.1 अब्ज डॉलर कमी झाली. आता त्यांची संपत्ती 49.7 अब्ज डॉलर आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत सगळ्यात जास्त कमी त्यांच्या संपत्तीत झाली आहे. नावाजलेले गुंतवणुकदार वॉरेन बफेदेखील या मंदीच्या सावटाखाली आले आहे. 2018 मध्ये त्यांची संपत्ती 6.37 अब्ज डॉलर कमी झाली आणि आता त्यांची संपत्ती 78.9 अब्ज डॉलर राहिली आहे. बिल गेट्स यांच्या संपत्ती 2.77 अब्ज डॉलर कमी झाली आहे.


कोणसाठी 2018 चांगला ठरला ?
भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2.94 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यावर त्यांची संपत्ती 43.3 अब्ज डॉलर होती. ते आता जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत 12 व्या स्थानी आहेत. तर जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि अमेरिकन टेक्नालॉजी व्यवसायीक जेफ बेजोस यांच्यासाठी 2018 सर्वात चांगला राहिला आहे. त्यांना या वर्षी 16.1 अब्ज डॉलरचा फायदा झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...