आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 2019 Nobel Prize For Economics: Abhijit Banerjee, Esther Duflo And Michael Kremer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक धोरणांनी अनेक देशांतील गरिबी हटवणारे भारतीय वंशाचे बॅनर्जी यांना नोबेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०११ मध्ये अभिजित व एस्तेय संशोधनासाठी हैदराबादला आले होते. - Divya Marathi
२०११ मध्ये अभिजित व एस्तेय संशोधनासाठी हैदराबादला आले होते.

ओस्लो - भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी, त्यांची पत्नी एस्तेय डिफ्लो आणि अमेरिकेचे मायकल क्रेमर यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ बंगालचे, परंतु मुंबईत जन्मलेले अभिजित यांनी जेएनयूमध्ये एमए केल्यानंतर १९८३ मध्ये अमेरिका गाठली. तेथे त्यांनी अार्थिक धोरणांना नवी दिशा दिली. अर्थशास्त्रातील नोबेल मिळवणारे अभिजित हे अमर्त्य सेन यांच्यानंतरचे (१९९८) दुसरे भारतीय आहेत. दोघेही प. बंगालचे असून ५८ वर्षीय अभिजित यांनी गरिबी दूर करण्यासाठी प्रचंड संशोधन केले आहे. त्यांच्या “पुअर इकॉनॉमिक्स’ पुस्तकास ‘गोल्डमन सॉक्स बिझनेस बुक ऑफ द इयर’ हा सन्मान मिळाला होता. या पुस्तकात त्यांनी धोरणांचा उल्लेख केला होता. मोरक्कोसारख्या डझनभर देशांनी ही धोरणे लागू केली. या यशाबद्दल अभिजित यांना नोबेल जाहीर झाले. ते अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्र शिकवतात. 
 

काँग्रेसची ७२ हजार रुपयांची ‘न्याय’ योजना अभिजित यांचीच कल्पना
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी “न्याय’ या योजनेची घोषणा केली होती. यात ७२ हजार रुपये दिले जाणार होते. हा आराखडा तयार झाल्यावर राहुल गांधी यांनी अभिजित यांचा सल्ला घेतला. त्यानुसार आराखड्यात बदल झोले होते. अभिजित म्हणाले होते की, “मूलभूत किमान उत्पन्नातून’ लोकांकडे पैसा आला तर गरिबी आपोआप दूर होईल.’
 

कोणत्याही देशातील गरिबी दूर करण्यासाठीचे उपाय ४ पुस्तकांतून मांडले 
अभिजित यांनी केलेले संशोधन जागतिक गरिबी निर्मूलनासाठी महत्त्वाचा आधार ठरले आहे. २००३ मध्ये त्यांनी अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब स्थापन केली. त्यांनी “पुअर इकॉनॉमिक्स’सह चार पुस्तके लिहिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅनलमध्ये ते होते. त्यांचे वडील दीपक बॅनर्जी व आई निर्मलाही अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. 
 
 

ते म्हणाले होते... शक्तिकांतना आरबीआय गव्हर्नर करणे भीतीदायक
११ डिसेंबर २०१८ रोजी अभिजित यांनी आरबीआय गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची झालेली नियुक्ती चुकीची असल्याचे सांगून अशा पदावर दास यांची नियुक्ती भीतीदायक ठरेल, असे नमूद केले होते. यानंतर सोमवारी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था सध्या याचे परिणाम भोगत असल्याचे नमूद केले होते.
 

एस्तेयने अभिजित यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली
अभिजित यांची पत्नी एस्तेय यांचा जन्म १९७२ मध्ये पॅरिस येथे झाला. त्याही एमआयटीमध्ये पॉव्हर्टी एलेव्हेशन अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सच्या प्रोफेसर आहेत. अभिजित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी केली. २०१५ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले.
 

बातम्या आणखी आहेत...