आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या फीचर्ससह TVS Apache RTR 180 2019 लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टीव्हीएस मोटर कंपनीने नवीन 2019 TVS Apache RTR 180 लाँच केली आहे. कंपनीने बाइक 2 व्हेरिएंटमध्ये लाँच केली. यात स्टँडर्ड TVS Apache RTR 180 ची एक्स शोरूम किंमत 84,578 रुपये आणि Apache RTR 180 ABS ची किंमत 95,392 रुपये आहे. 

 

>> नवीने आपाचेमध्ये कॉस्मेटिक अपडेट्स पाहायला मिळतील, ज्यात रेस-इंस्पायर्ड ग्राफिक्स आणि रिवाइज्ड इंस्ट्रूमेंट क्लस्टर सोबतच त्याच्या एबीएस व्हेंरियंटमध्ये ड्युल-चॅनल एबीएस दिले गेले आहे. तर, कॉस्टमेटिक अपडेट्स बद्दल सांगायच झाल तर, या बाइकमध्ये डायल-आर्ट सोबतच बॅक-लिट स्पीडोमीटर, अल्कंटारा फिनिश सीट आणि इंटीग्रेटेड फ्रेम स्लाइडर्स आणि क्रॅश गार्ड दिले आहे.

>> 2019 ची Apache RTR 180 पाच रंगात उपलब्ध होइल, ज्यात पर्ल व्हाइट, ग्लॅास ब्लॅक, टी ग्रे, मॅट ब्लू आणि मॅट रेड आहेत. या गाडीची स्टाइलिंग रेसिंग कार्बन फाइबर थिमवर आधारित आहे. 

>> मॅकेनिकली या बाइकमध्ये कोणताच बदल केला नाही. यात 177.4 cc सिंगल सिलिंडर, 4-स्ट्रोक इंजिन आहे, जे 16.62PS ची पॅावर आणि 15.5Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स दिला आहे. बाइकचे वजन 139 किलोग्रॅम आहे. 

>> कंपनीचा दावा आहे की, या गाडीचे माइलेज 43 किलोमीटर प्रति लिटर आहे आणि याची टॉप स्पीड 114 किलोमीटर प्रति तास आहे. मार्केटमध्ये या गाडीची टक्कर सुझुकी जिक्सर, होंडा सीबी हॉर्नेट आणि बजाज पल्सर 180 सारख्या बाइक सोबत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...