आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर खरेदीसाठी 2020 चांगले ठरेल, किंमत 2 % वाढेल : सर्व्हे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​बंगळुरू : आर्थिक मरगळीच्या पार्श्वभूमीवर भारतातील गृह प्रकल्पाच्या बाजारपेठेत यंदा घरांच्या किमतीत केवळ २ टक्क्यांची वाढ होऊ शकते. हा अंदाज वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या पाहणीत व्यक्त केला आहे. १९ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान केलेल्या १७ मालमत्ता विश्लेषणाच्या पाहणीत भारतात कमकुवत आर्थिक धारणा आणि मरगळीमुळे मालमत्तेच्या किमती वाढण्याची शक्यता कमी आहे. सरकारने रियल इस्टेट क्षेत्राला बूस्ट देण्यासाठी अनेक घोषणा केल्यानंतरही अशी स्थिती आहे. रॉयटर्सने तीन महिन्यांआधीही पाहणी केली होती. त्यात सध्याच्या वर्षात ३.०% आणि ४.२५% किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली होती. महागाई दराच्या हिशेबाने पाहिल्यास किमतीतील वृद्धी नकारात्मक आहे. यामुळे लोकांना कमी किमतीत घर मिळू शकते. मात्र, दीर्घ अवधीत ही स्थिती नुकसान देईल. मालमत्ता तज्ञांच्या म्हणण्यानुसार, नफा घटल्याने बिल्डर बाजारात टिकू शकणार नाहीत. नोटबंदी, रेरा आणि पुन्हा जीएसटीसारख्या सुधारात्मक पावलांमुळे रियल इस्टेट आधीपासूनच संकटात होते. रोकड नसल्यामुळे अनेक प्रकल्प बंद आहेत. आता नफा कमी झाल्याने ही स्थिती आणखी वाढू शकते. त्यामुळे घर खरेदी करताना पूर्ण चौकशीनंतरच खरेदी करावी.रॉयटर्सने नोव्हेंबर २०१८ पासून अशा पद्धतीची पाहणी सुरू केली होती. तेव्हा बहुतांश शहरांत पाहणीत सांगितले की, किमतीत कोणताही बदल झालेला नाही. बंगळुरू आवश्यक किमती अपेक्षेपेक्षा दुप्पट झाल्या आहेत.
 
एनारॉक प्राॅपर्टी कन्सल्टटंटचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले, जोवर मोठा आधार मिळत नाही, तोवर घरांच्या मागणीत विशेष उल्लेखनीय बदल येणार नाही. लिक्विडिटी क्रायसिसमुळे प्रकल्पात विलंब होत आहे. ज्यामुळे लोक घर कमी खरेदी करत आहेत. 

मुंबई, दिल्लीत जास्त किमती

वर्ष २०१८ मध्ये घराच्या किमती सरासरी ५.७% वाढल्या होत्या. हे २०१० नंतर सर्वात कमी होते. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट कमी होत आहेत आणि गृह कर्जाच्या व्याज दरात आता ८ टक्क्यांपेक्षाही खाली गेले आहेत. तरीही बाजारात खरेदीदार कमी आहेत. मुंबई, दिल्ली आणि एनसीआरमध्ये संपत्ती जास्त किमतीच्या आहेत. बंगळुरू ,चेन्नईमध्ये किमती योग्य स्थितीत आहेत.

मागणी घटल्यावर किमतीत वाढ नाही

बाजारात मागणी नाही, त्यामुळे किमतीही जास्त वाढल्या नाहीत. खरेदीदारांसाठी ही चांगली वेळ आहे. नफा कमी झाल्याने बिल्डरांना प्रकल्प पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. सरकारी उपायांचा परिणाम होईल.
- सतीश मागर, अध्यक्ष, क्रेडाई

मालमत्ता दर आणि गृह कर्ज दर दोन्ही नीचांकावर आहेत. खरेदीसाठी ही वेळ योग्य आहे. विकासकांनी खरेदीदारांची गरज ओळखली पाहिजे.
- डॉ. निरंजन हिरानंदानी,  अध्यक्ष, नारडेको व असोचॅम

७०% म्हणाले, बजेटचा परिणाम होणार नाही 

रॉयटर्सच्या पाहणीत ७०% विश्लेषकांनी सांगितले की, बजेट तरतुदींचा हाऊसिंग मार्केटवर कोणताही परिणाम पडणार नाही. मात्र, सर्व विश्लेषकांनी रियल इस्टेटमध्ये मंदीचा पर्याय निवडला नाही. कुशमॅन अँड वेकफिल्ड इंडियाचे रिसर्च प्रमुख रोहन शर्मा यांनी सांगितले की, या क्षेत्रात हळूहळू विक्रीत सुधारणा होईल. लिक्विडिटी नसल्याने विकासकांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता नाही. 

बातम्या आणखी आहेत...